HOME   महत्वाच्या घडामोडी

पीएम-सीएम भेटले, उन्नाव पिडीता देवाघरी, दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार, औरंगाबादेत काळा दिवस, निकम म्हणतात एनकॉऊंटर अयोग्य.....०७ डिसेंबर १९


पीएम-सीएम भेटले, उन्नाव पिडीता देवाघरी, दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार, औरंगाबादेत काळा दिवस, निकम म्हणतात एनकॉऊंटर अयोग्य.....०७ डिसेंबर १९

* लातुरच्या दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरु
* परभणीत अज्ञाताने पेट्रोल टाकून जाळले सीडीएम आणि एटीएम मशीन, लाखोंचे नुकसान
* महाविद्यालये रॅगिंगमुक्त व्हावीत यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरु डॉ दिलीप म्हैसेकर
* उन्नाव बलात्कार पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू
* उन्नाव बलात्कारपिडीता न्यायालयात जाताना आरोपींनी रॉकेल टाकून जाळले होते
* दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार शक्य
* दोन दिवसातच खातेवाटपाची प्रक्रियाही होईल पूर्ण- बाळासाहेब थोरात
* परळच्या बीआयटी चाळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार
* पुण्याच्या विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत
* दिल्लीतील निर्भयाच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींची फाशी निश्चित
* राज्य कर्मचार्‍यांचा कामाचा आठवडा होणार पाच दिवसांचा
* पहिल्या टी-२० सामन्यात भारताने केला वेस्ट इंडीजचा पराभव
* मराठा आरक्षण आंदोलनातील १२५ कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु
* बाबरी मशीदीच्या पतनाच्या निषेधार्थ औरंगाबादेत मुस्लीम संघटनांनी पाळला काळा दिवस
* हैदराबादेत बलात्कार्‍यांचं एन्काऊंटर करणार्‍या पोलिसांवर नागरिकांनी केला फुलांचा वर्षाव
* हिंगोलीतील महिलांनी पेढे वाटून केला आनंद व्यक्त
* हैदराबादेतील एन्काऊंटर अयोग्य- उज्वल निकम
* जया बच्चन, मायावती यांनी हैदराबादेतील एन्काऊंटरचं केलं स्वागत
* तुरुंगवासाच्या १०६ दिवसांच्या काळात कणखर बनलो- पी. चिदंबरम
* पंकजा मुंडे भाजपातच- महादेव जानकर
* पोक्सोच्या गुन्हेगारांना दया याचिका करण्याचा अधिकारच नको- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
* भाजपाने पाच वर्षांपासून राष्ट्रवादीच्या बदनामीची मोहीम उघडली होती- जयंत पाटील
* मुंबईत आजपासून दहा टक्के पाणी कपात
* यंदाच्या लोकसभेतील २३३ खासदारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी


Comments

Top