HOME   महत्वाच्या घडामोडी

रेणा कारखान्यावर साईबाबा, चांद्रयान तीनची तयारी, मोदी कांदे उगवणार? मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर.....०९ डिसेंबर १९


रेणा कारखान्यावर साईबाबा, चांद्रयान तीनची तयारी, मोदी कांदे उगवणार? मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर.....०९ डिसेंबर १९

* रेणा साखर कारखाना परिसरात झाली साईबाबांच्या मुर्तीची दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिष्ठापना
* सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व उपस्थिती भत्त्यात दुप्पट वाढ करा, लातुरच्या सामाजिक संघटनांची मागणी
* १५ डिसेंबरला राजस्थान शाळेमागच्या मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभा
* एसटीतून सवलतीने प्रवास करणार्‍यांना एक जानेवारीपासून स्मार्टकार्ड बंधनकारक
* लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली, भाव गेला चार हजार १८० रुपयांवर
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून मिळाली सुटी
* व्हाट्सअ‍ॅपने सुरु केले कॉल वेटींग फिचर
* चांद्रयान तीन मोहीमेची तयारी सुरु, सरकारकडे मागितले ७५ हजार कोटी
* मुंबईचा आगामी महापौर भाजपचा- चंद्रकांत पाटील
* एकनाथ खडसे भाजपा सोडणार नाहीत- चंद्रकांत पाटील
* भाजपा फार काळ सत्तेबाहेर राहणार नाही- देवेंद्र फडणवीस
* गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत सादर करणार नागरिकत्व विधेयक
* ज्येष्ठ पत्रकार डॉ. रवींद्र रसाळ यांचे निधन
* लोक म्ह्णतात कांद्याचे भाव करा, मोदी काय कांदे उगवणार आहेत का?- बाबा रामदेव
* ८९ टक्के निर्भया निधी पडून
* उद्धव ठाकरे सरकार पाहुणं सरकार, फार काळ टिकणार नाही- नारायण राणे
* शिवसेनेनं हिंदुत्व विकून मुख्यमंत्रीपद मिळवलं- नारायण राणे
* हिवाळी अधिवेशनानंतर होईल मंत्रीमंडळाचा विस्तार- छगन भुजबळ
* उन्नाव बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला मिळणार २४ तास सुरक्षा, शस्त्र परवानाही मंजूर
* उन्नाव पिडीतेचं झालं दफन, बहिणीला नोकरी आणि घर मिळणार
* मातोश्रीवरील शिवसेनेची बैठक झाली रद्द
* चर्चा अंतिम टप्प्यात, लवकरच होईल खातेवाटप- बाळासाहेब थोरात
* दिल्लीत स्कूल बॅग बनवणाऱ्या कारखान्यात आग, ४३ जणांचा मृत्यू


Comments

Top