HOME   महत्वाच्या घडामोडी

मुंडेंच्या स्मारकासाठी निधी, भाजपा-सेना कधीही एकत्र येऊ शकतात, महापोर्टलवर घाला बंदी, मुलांनाही हेल्मेट सक्ती, खातेवाटपच नाही प्रश्न विचारायचे कुणाला?.....११ डिसेंबर १९


मुंडेंच्या स्मारकासाठी निधी, भाजपा-सेना कधीही एकत्र येऊ शकतात, महापोर्टलवर घाला बंदी, मुलांनाही हेल्मेट सक्ती, खातेवाटपच नाही प्रश्न विचारायचे कुणाला?.....११ डिसेंबर १९

* लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची आरक्षण सोडत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात
* गरुड चौक ते बार्शी मार्ग रस्त्याचे होणार नूतनीकरण
* गोंद्रीचा साईबाबा कारखाना देणार ऊसाला २४०० रुपयांचा भाव
* रेणापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या आरती प्रदीप राठोड
* सिंचन प्रकल्पांबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली- एकनाथ खडसे
* एकनाथ खडसे यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट
* शिवसेनेने केले नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान, काँग्रेस नेते नाराज
* नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रकरणी अमित शाह यांच्यावर बंदी घाला, अमेरिकन आयोगाची मागणी
* नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत दाखल होणार
* महापरिक्षा पोर्टलवर कायमची बंदी घाला, आ. बच्चू कडू यांची मागणी
* गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री
* फडणवीस सरकारला पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारणे शक्य झाले नाही- एकनाथ खडसे
* आता चार वर्षांवरील मुलांनाही हेल्मेट सक्ती
* महानाट्य ‘जाणता राजा’ महानाट्य बारा वर्षांनंतर पुन्हा रंगमंचावर, २५ ते २९ डिसेंबरला सिंहगड रोड वर होणार प्रयोग
* दोन हजार रुपयांची नोट रद्द होण्याची केवळ अफवा, सरकारकडून खुलासा
* व्हाट्सअ‍ॅपवर आता रिमाइंडर फिचरची सुविधा
* पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा झाला लिलाव, १५ कोटी आले
* गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे, खातेवाटप ठरल्याची चर्चा
* अजून खातेवाटपच नाही, मग विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न कुणाला विचारायचे? देवेंद्र फडणविसांचा सवाल
* भाजपा आणि शिवसेना कधीही एकत्र येऊ शकतात- मनोहर जोशी
* समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शक्यता
* पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाला आज होणार सुरुवात
* भारत आणि वेस्ट इंडीजचा तिसरा टी-२० सामना आज वानखेडे स्टेडीयमवर


Comments

Top