HOME   महत्वाच्या घडामोडी

आंबेडकर उद्यानाचा कायापालट, रमेश कराडांवर अन्याय का? लातुरात हिंदू राष्ट्र जागृती सभा, लातुरची कॉंग्रेस दिल्लीत.....१३ डिसेंबर २०१९


आंबेडकर उद्यानाचा कायापालट, रमेश कराडांवर अन्याय का? लातुरात हिंदू राष्ट्र जागृती सभा, लातुरची कॉंग्रेस दिल्लीत.....१३ डिसेंबर २०१९

* लातुरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार- उप महापौर चंद्रकांत बिराजदार
* लातुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभिकरण, निघाला कार्यादेश
* भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची रमेश कराड यांच्यासोबत बंद दाराआड अर्धा तास चर्चा
* रमेश कराड यांच्यावर पक्षाने अन्याय का केला? भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केला थेट सवाल
* लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर
* लातूर पंचायत समितीचे सभापतीपद मिळणार खुल्या वर्गातील महिलेला
* औसा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसाठे वाढवण्याची मोहीम राबवणार- आ. अभिमन्यू पवार
* लातूर अर्बन बॅंकेच्या वतीने उद्या लातुरात कवी संमेलन, डॉ. कुमार विश्वास येणार
* हिंदू जनजागृती सभेच्या वतीने १५ डिसेंबरला राजस्थान शाळेमागे हिंदू राष्ट्र जागृती सभा
* १४ डिंसेबर रोजी दिल्लीत भारत बचावो आंदोलन आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागासाठी रवाना
* बहुजन समाजाचा भाजपा मूठभर लोकांची जहागिरी करु नका- पंकजा मुंडे
* भाजपा माझ्या वडिलांचा पक्ष, कदापी सोडणार नाही- पंकजा मुंडे
* पंकजा मुंडे कोअर कमिटी सोडणार
* निर्भया प्रकरणातीला गुन्हेगारांना तातडीने फाशी द्या, आईची याचिका, आज सुनावणी
* २३ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार
* ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर; एकनाथ शिंदेंकडे गृह, जयंत पाटलांकडे अर्थ तर बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते
* शिवसेनला १८, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस प्रत्येकी १५ मंत्रीपदे
* छगन भुजबळांकडे आले जलसंपदा खाते
* १६ डिसेंबरपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन
* काही व्यक्तींकडून चुका झाल्या असतील त्यासाठी पक्षाला दोषी धरु नका- चंद्रकांत पाटील
* गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला- एकनाथ खडसे
* अनील गोटे यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपात निराशा झाल्याची भावना
* ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिल्यास होणार तुरुंगवास
* आगामी काळात आर्थिक संकट आणखी तीव्र होणार- आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
* राम जन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या सर्व १८ पुनर्विचार याचिका फेटाळल्या
* आता मुंबई महानगरपालिका करणार वीज निर्मिती
* मुंबई-पुणे मार्गावर दर चार मीटरवर बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे


Comments

Top