HOME   महत्वाच्या घडामोडी

दिलीपरावांनी घेतली शेतकरी संघटनेच्या नेत्याची भेट, दोन शिवसैनिक निघाले पायी शिवतिर्थाकडे, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर, दूध दोन रुपयांनी महाग.....१५ डिसेंबर १९


दिलीपरावांनी घेतली शेतकरी संघटनेच्या नेत्याची भेट, दोन शिवसैनिक निघाले पायी शिवतिर्थाकडे, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर, दूध दोन रुपयांनी महाग.....१५ डिसेंबर १९

* लातूर महापालिकेने तीन महिन्यांनंतर केला एकाच महिन्याचा पगार
* प्रोटोकॉल न पाळता स्थायी समिती सभापतींनी केलेले बागेचे भूमीपूजन अवैध- उप महापौर चंद्रकांत बिराजदार
* लातुरच्या संगम नर्सरीला माजी मंत्री दिलीपराव देशमुख
* माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट
* चळवळी जिवंत ठेवल्या पाहिजेत आणि त्यांना बळ दिले पाहिजे, दिलीपरावांचे आवाहन, मोरे यांच्या कामांचे केले कौतुक
* शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने लातुरचे दोन शिवसैनिक शिवतिर्थाकडे पायी रवाना
* लातुरच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५९१ प्रकरणे निघाली तडजोडीने
* परंड्यात अवैध वाळू उपसा करणार्‍यांनी तहसीलदारांचा अंगावर घातला ट्रॅक्टर,
* औरंगाबादेत शिवसेना-भाजपाची युती संपली, भाजपा बसणार विरोधी बाकावर
* उद्यापासून दूध दोन रुपयांनी महगणार
* फेसबुकवर मिळणार खोट्या बातम्यांबद्दल अलर्ट
* आज जागतिक चहा दिन
* छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्या काही खात्यात अदलाबदल
* सावरकरांवरील विधान: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहूल गांधींवर नाराज, लवकरच सोनिया गांधींशी बोलणार
* राहूल गांधींना जोडे मारा, सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचे शिवसैनिकांना आवाहन
* सावरकर हे देशाचे दैवत- संजय राऊत
* भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे, एकनाथ खडसे अनुपस्थित
* चुकीच्या मार्गाने जायचं आणि पोलिसाला बक्कल नंबर विचारायचा हे चालणार नाही- अजित पवार
* उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन
* गांधी असल्याने कुणी गांधी होत नाही, राहूल गांधींनी माफी मागावी- देवेंद्र फडणवीस
* उध्दव ठाकरे यांनी सावरकरांचा त्याग राहूल गांधींना समजाऊन सांगावा- देवेंद्र फडणवीस
* उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अठरा वर्षीय तरुणीवर बलात्कार, जाळून मारण्याचा प्रयत्न, नव्वद टक्के भाजली
* देशातील शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले: सोनिया गांधी
* ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे १५ नागरिक विजयी
* आगामी काळातील युध्दं फार कमी काळ चालतील- लष्करप्रमुख बिपीन रावत
* चेन्नईत आज भारत वेस्ट इंडीज दरम्यान होणार एक दिवसीय सामना


Comments

Top