HOME   महत्वाच्या घडामोडी

अडलेल्या गायीची सुखरुप प्रसुती, दूध महागले, पळशी खून प्रकरणात ०६ जणांना अटक, एनईएफटी २४ तास, आजपासून विधीमंडळ.....१६ डिसेंबर २०१९


अडलेल्या गायीची सुखरुप प्रसुती, दूध महागले, पळशी खून प्रकरणात ०६ जणांना अटक, एनईएफटी २४ तास, आजपासून विधीमंडळ.....१६ डिसेंबर २०१९

* 'मी सावरकर' लिहिलेल्या टोप्या घालून भाजपचे आमदार विधानसभेत
* लातुरचे पक्षीमित्र महेबूबभाई यांनी वाचवले गायीचे प्राण, केली सुखरुप प्रसुती
* लातुरच्या महाराष्ट्र महाविद्यालयात ०३ ते १२ जानेवारी दरम्यान योग शिबिराचे आयोजन
* लातूर मनपाची विशेष स्वच्छता मोहीम पोचली चाळीस हजार घरांपर्यंत
* पळशी येथील खून प्रकरणातील सर्वच सहा संशयित आरोपींना लातूर पोलिसांनी केली अटक
* व्हाट्सअ‍ॅपसारखेच पण सुरक्षित सरकारी अ‍ॅप लवकरच दखल होणार
* आजपासून एनईएफटी सुविधा २४ तासात सुरु राहणार
* महाविद्यालयीन निवडणुका होणार कायमस्वरुपी बंद
* सांगलीचे शिक्षक नेते, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे निधन
* विधीमंडळाचं आजपासून नागपुरात अधिवेशन, सावरकर प्रकरणी भाजपा शिवसेनेला घेरणार
* पंजाब बॅंकेतील घोटाळा: ग्राहकांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* आशिष शेलार भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद
* विरार पूर्वमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मोबाईल दुकानदाराचा मृत्यू
* मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव- उद्धव ठाकरे
* बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळी ५० टक्के वाढ
* कोल्हापुरात राहूल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा पेटवताना अभाविपचा कार्यकर्ता होरपळला
* सावरकरांबद्दल आमची जी भूमिका होती तीच कायम आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
* भाजपा सरकारनेच सावरकरांच्या विचारांशी द्रोह केला- उद्धव ठाकरे
* पिशवीबंद दुधाच्या दरात आजपासून झाली दोन रुपयांची वाढ
* महाबळेश्वरचे तापमान कमालीचे घटले, पर्यटकांची गर्दी वाढली
* भिवंडीत नवविवाहित जोडप्याला आहेरात एकाने दिले दोन किलो कांदे
* दिग्दर्शक जब्बार पटेल १०० व्या नाट्यसंमलेनाचे अध्यक्ष, नाट्य परिषदेकडून घोषणा
* सत्तेसाठी किती काळ लाचारी स्विकारणार: देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न
* वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर राहुल गांधी यांच्याविरूद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करणार


Comments

Top