HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरवर धुक्याची चादर, नवं सरकार करणार शेतकर्‍यांची कर्जमाफी, रेल्वेतील खाद्यपदार्थ महागणार, आज-उद्या शरद पवार नागपुरात, मनोज नरवणे लष्करप्रमुख.....१७ डिसेंबर १९


लातुरवर धुक्याची चादर, नवं सरकार करणार शेतकर्‍यांची कर्जमाफी, रेल्वेतील खाद्यपदार्थ महागणार, आज-उद्या शरद पवार नागपुरात, मनोज नरवणे लष्करप्रमुख.....१७ डिसेंबर १९

* आज लातूर शहरावर पसरली धुक्याची चादर, पाहण्यासाठी अनेकांनी केली उड्डाण पुलावर गर्दी
* लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून सरकारने केले २२० कोटी रुपये वर्ग
* लातुरच्या अवंतीनगरातून एक महिला सात वर्षांच्या मुलीसह बेपत्ता
* नागरिक दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात रेणापुरात निघाला मोर्चा
* लातुरात गोरक्षणमागे सप्टेंबर महिन्यात झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दोन आरोपींना उदगीर आणि हैदराबातून अटक
* लांब पल्ल्याच्या रेल्वेतील खाद्यपदार्थ १० ते १५ रुपयांनी वाढणार
* बांगलादेश सरकार आपल्या देशातून परदेशी गेलेल्या नागरिकांना परत घेण्यास तयार
* शिवसेना शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, उद्धव ठाकरे यांचे संकेत
* शिवस्मारकाच्या कामात भाजपाने भ्रष्टाचार केल्याचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप
* नवे सरकार करणार शिवस्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार
* दिल्लीच्या इंडीया गेटवर प्रियंका गांधी यांनी केले केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन
* प्रियंका गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून औरंगाबादमध्ये झाले धरणे आंदोलन
* नवी दिल्लीतील हिंसक आंदोलन सोशल मिडियामुळे भडकले, पोलिसांचा आरोप
* महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज नागपुरात बैठक, विरोधकांना उत्तर देण्यासाठी रणनिती ठरणार
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील याचिकांवर उद्या होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* युती तुटली असली तरी आम्ही धर्मांतर केलेले नाही- उद्धव ठाकरे
* सावरकरांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ
* सत्तेच्या लाचारीसाठी सावरकरांचा अवमान का सहन करता? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
* आज आणि उद्या शरद पवार विधानसभेच्या अधिवेशनाला हजर राहणार
* महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट मनोज नरवणे लष्करप्रमुख म्हणून पुढच्या महिन्यात कार्यभार स्विकारणार
* भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सेंगर उन्नाव प्रकरणी ठरले दोषी, उद्या शिक्षेची सुनावणी
* बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने मुंबईच्या कांदिवलीत भावाने केली गोळी झाडून आत्महत्या
* महिलांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना हातपाय तोडण्याची शिक्षा द्यावी- रामदास आठवले
* दोन ते सात जानेवारी काळात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन


Comments

Top