HOME   महत्वाच्या घडामोडी

नटसम्राट श्रीराम लागू यांचं निधन, दोन टप्प्यात शेतकर्‍यांना कर्जमाफी, खडसे भेटले पवारांना, नागपुरच्या महापौरावर गोळीबार, मराठा आरक्षणावर सुनावणी.....१८ डिसेंबर १९


नटसम्राट श्रीराम लागू यांचं निधन, दोन टप्प्यात शेतकर्‍यांना कर्जमाफी, खडसे भेटले पवारांना, नागपुरच्या महापौरावर गोळीबार, मराठा आरक्षणावर सुनावणी.....१८ डिसेंबर १९

* लातुरात घरफोडी करणार्‍या आरोपीकडून ३२,५५० रुपयांचा ऐवज जप्त
* रबी पीक विमा योजनेत लातूरचा समावेश करा, राष्ट्रवादीची मागणी
* बीडचे पोलिस शिपाई दिलीप केंद्रे यांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
* ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात निधन, आज अंत्यसंस्कार
* मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन टप्प्यात शेतकर्‍यांना मिळणार कर्जमाफी
* कर्जमाफी करण्यासाठी सरकारने नेमली दोन पथकं
* कर्जमाफी करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या, शरद पवार यांची सरकारला सूचना
* एकनाथ खडसे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* २३ किंवा २४ डिसेंबरला होणार मंत्रीमंडळाचा विस्तार
* जानेवारी महिन्यात मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अजित पवार यांची इच्छा
* तुम्ही पुन्हा येणार! नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी
* नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील ५९ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार
* अतिक्रमण मोहीम सुरु केल्यापासून जोशी यांना आली होती दोन धमकीची पत्रं
* मद्यधुंद तरुणांचा नागपुरच्या आमदार निवासात गोंधळ, आमदारांना धमकावले, पैशाचीही केली मागणी
* अमरावतीत आई आणि मुलीवर सामुहिक बलात्कार, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
* महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग हीच भाजपाची वृत्ती: शिवसेनेची टीका
* ओडिशात ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
* आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे पैठण येथे दहन
* जीएसटी परिषदेची आज बैठक
* पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा, विशेष न्यायालयाचा निकाल
* विशाखापट्टणम येथे आज भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये दुसरा एकदिवसीय सामना


Comments

Top