HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवसेनेकडून जिवाला धोका; किरीट सोमय्यांची तक्रार, महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन, महापरिक्षा पोर्टल बंद करा आ. सतीश चव्हाणांची मागणी, विधीमंडळावर ११ मोचे.....१९ डिसेंबर १९


शिवसेनेकडून जिवाला धोका; किरीट सोमय्यांची तक्रार, महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन, महापरिक्षा पोर्टल बंद करा आ. सतीश चव्हाणांची मागणी, विधीमंडळावर ११ मोचे.....१९ डिसेंबर १९

* लातुरच्या लक्ष्मीनारायण ग्रुपने केला महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा सत्कार
* मांजरा साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पहिला पुरस्कार जाहीर
* परंड्यात तहसीलदारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांनी केले काम बंद आंदोलन
* लातुरच्या पोलिस मुख्यालयातील कर्मचारी बळवंत भातलवंडे यांचे हृदयविकाराने निधन
* प्रधानमंत्री पीक योजनेसाठी ३१ डिसेंबरपूर्वी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
* ‘महापरीक्षा पोर्टल’ तात्काळ बंद करा, आ. सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत लक्षवेधी
* नागरिकत्व कायद्याबद्दल मुस्लीमांनी घाबरु नये, शाही इमामांचे आवाहन
* विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी केलं पहिलं भाषण
* ‘सामना’तील बातम्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांना केला घेरण्याचा प्रयत्न
* नागरिकत्व कायद्याची महाराष्ट्रात तातडीने अमलबजावणी करण्याची भाजपाकडून मागणी
* मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीही लावली हजेरी
* शिवसेनेकडून आपल्या जिवाला धोका, किरीट सोमय्यांनी केली तक्रार
* २९ डिसेंबरला संजय राऊत घेणार शरद पवार यांची मुलाखत
* विधीमंडळाच्या अधिवेशनावर एकाच दिवसात धडकले ११ मोर्चे
* आ. शिवेंद्रराजे सातार्‍यातील टोलनाका करणार बंद
* निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशीच होणार, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली
* अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
* ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन यांची निवड, मोदींनी केले स्वागत
* बलात्कार्‍यांना तातडीने शासन करणारा आंध्रातील ‘दिशा’ सारखा कायदा महाराष्ट्रातही होणार
* माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागपुरात सत्कार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, प्रफुल पटेल होते उपस्थित
* मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होणार महाविकास आघाडीचा प्रयोग
* प्रादेशिक पक्ष भाजपाला पर्याय देऊ शकतील- शरद पवार
* नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
* सध्यातरी दुसर्‍या पक्षात जाण्याचा विचार नाही- एकनाथ खडसे
* एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करणार- सुधीर मुनगंटीवार
* शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात झाले लष्करी इतमामात अंत्यसंस्कार


Comments

Top