HOME   महत्वाच्या घडामोडी

अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने, महाराष्ट्रात मात्र शांतता, बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते, अण्णा हजारेंचं मौन आंदोलन.....२० डिसेंबर १९


अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने, महाराष्ट्रात मात्र शांतता, बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते, अण्णा हजारेंचं मौन आंदोलन.....२० डिसेंबर १९

* लातूर मनपातील सत्त्ताधार्‍यांनी दलित वस्ती विकासाचा निधी पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी वळवला- नगरसेवक अजित कव्हेकर
* जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी शिक्षक संघाचे उद्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
* लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पंचायत समित्यांच्या सभापतींच्या निवडी लांबणीवर
* नागरिकत्व कायद्याविरोधात गुजरात आणि बिहार-यूपीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, तिघांचा मृत्यू
* लखनौमध्ये आंदोलकांनी बसेसह मिडियाच्या ओबी व्हॅनही जाळल्या
* कोलकात्यात ममता बॅनर्जी काढणार आज रॅली
* हिंसक आंदोलनामुळे कर्नाटकात संचारबंदी लागू
* महाराष्ट्रातही आंदोलने झाली, पण कुठेही गालबोट नाही
* दिल्लीत तणावपूर्ण स्थिती, भागांमध्ये इंटरनेटसह सर्वप्रकारची मोबाईल सेवा बंद
* इंटरनेट आणि मोबाईल फोनसेवा बंद करण्याचा अधिकार सरकारला नाही- राहूल गांधी
* औरंगाबाद आणि पुण्यात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ झाली निदर्शने
* महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकी सरकार- देवेंद्र फडणवीस
* बुलेट ट्रेनपेक्षा गरिबांना तीन चाकी रिक्षाच परवडते- उद्धव ठाकरे
* विधानसभा अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांनी शेतकरी प्रश्नावरुन सरकारला घेरण्याचा केला प्रयत्न
* २३ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार, अजित पवार यांचे संकेत
* महामंडळे आणि सरकारी समित्या लवकरच होणार बरखास्त
* मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
* निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी होऊपर्यंत मौन धारण करणार- अण्णा हजारे
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* भारत आणि रशियाच्या सैनिकांच्या संयुक्त सरावाचा झाला समारोप


Comments

Top