HOME   महत्वाच्या घडामोडी

विलास कारखान्याची निवडणूक, पवारांची सीबीआय चौकशी नाही, ओवेसींचं शांततेचं आवाहन, सेनेची १० रुपयात थाळी, ऑनलाईन औषध विक्रीला विरोध.....२१ डिसेंबर २०१९


विलास कारखान्याची निवडणूक, पवारांची सीबीआय चौकशी नाही, ओवेसींचं शांततेचं आवाहन, सेनेची १० रुपयात थाळी, ऑनलाईन औषध विक्रीला विरोध.....२१ डिसेंबर २०१९

* लातूर मनपाच्या शहर वाहतूक विभागात दाखल झाल्या तीन बसेस, एकूण झाल्या १३
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आम्ही लातुरकरच्या वतीने सोमवारी तहसीलवर मोर्चा
* लातुरच्या शाहू चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वास, चबुतराही बांधला जाणार
* ऑनलाईन औषध विक्रीला लातुरच्या औषध विक्रेत्यांचा विरोध, अन्न-औषध प्रशासनाला दिले निवेदन
* निवळीच्या विलास साखर कारखान्याची निवडणूक जाहीर, पुढच्या महिन्यात १९ तारखेला मतदान
* उदगीरमध्ये आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला अटक
* रेणा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार जाहीर
* पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत नटसम्राट श्रीराम लागू यांच्यावर झाले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
* सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या सीबीआय चौकशीला सरकारचा नकार
* वचननाम्यानुसार शिवसेनेने मनपातील कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध केली दहा रुपयात थाळी, अन्यत्रही लवकरच सुरु होणार
* महाराष्ट्रात १५ जिल्ह्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने, काही ठिकाणी हिंसक वळण, परभणी, हिंगोली आणि बीडमध्ये दगडफेक
* खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केले शांततेचे आवाहन, म्हणाले हिंसक आंदोलन नुकसान करणारे
* विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
* केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी हातमिळवणी केली- नारायण राणे
* अजित पवार आमचे उप मुख्यमंत्री असतील- संजय राऊत
* फडणवीस सरकारच्या काळात ६६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची शक्यता- कॅग
* राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद
* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलं मौनव्रत आंदोलन, निर्भयाच्या दोषींना तातडीने फाशी देण्याची मागणी
* उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शक्यता
* येत्या खरीप हंगामापूर्वी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मिळणार कर्जमाफी- अजित पवार
* राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साडेबारा वाजता आज पुण्यात पत्रकार परिषद
* राज्यातील सरकारी कार्यालये होणार तंबाखूमुक्त, पथके नेमली जाणार
* महाराष्ट्रातील तोट्यातली महामंडळे बंद करावईत, कॅगची शिफारस
* हिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, कॉलेजना आज सुटी
* आठवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार


Comments

Top