HOME   महत्वाच्या घडामोडी

जुन्याच जागी कोंडवाडा, अल्पवयीनावर अत्याचार, आज लातूर तहसीलवर मोर्चा, झारखंडमध्ये कॉंग्रेस आघाडीवर, गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे.....२३ डिसेंबर २०१९


जुन्याच जागी कोंडवाडा, अल्पवयीनावर अत्याचार, आज लातूर तहसीलवर मोर्चा, झारखंडमध्ये कॉंग्रेस आघाडीवर, गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे.....२३ डिसेंबर २०१९

* लातुरच्या एमआयडीसी चौकातील एसएस लॉजवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्यवस्थापकाला अटक, चार तरुणी ताब्यात
* लातुरच्या जिल्हा बॅंकेमागे असलेल्या जुन्याच जागी पुन्हा होणार कोंडवाडा
* प्लास्टीकचा कचरा जमवण्यासाठी जनाधार संस्थेला नवीन जागा शोधण्याचे आदेश
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आज लातुरच्या गंजगोलाईतून तहसीलवर मोर्चा
* मी लातुरकर संघटनेच्या वतीने करण्यात आली स्मशानभूमीची सफाई
* लातुरात सोयाबीनचा भाव गेला चार हजार तीनशेवर
* आ. अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत मांडले औसा तालुक्याचे विविध प्रश्न
* अमित शाह आणि मोदी यांनी तरुणांचे भविष्य उध्वस्त केले, राहूल गांधी यांचा आरोप
* आज झारखंडमध्ये मतमोजणी, भाजपचे नुकसान होण्याचे अंदाज
* हवे तर माझे पुतळे जाळा, गरिबांच्या झोपड्या जाळू नका, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
* मुस्लिमांना देश सोडावा लागणार नाही- पंतप्रधान मोदी
* मुस्लीमांनी घाबरण्याचे कारण नाही- रामदास आठवले
* महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार लांबण्याची शक्यता, यादीत घोडे अडले
* येत्या आठ तारखेला विमा आणि बॅंक कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप
* नेहरू कुटुंबाचं नागरिकत्व रद्द कराः साध्वी प्राची
* नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात उत्तरप्रदेशातील बळी १८, जखमी पोलिस २६३
* जनाधार नसलेले पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करीत आहेत- नितीन गडकरी
* देशातील ६२ टक्के लोक नागरिकत्व कायद्याच्या बाजुने: एका पाहणीचा अहवाल
* शिवसेनेचे आता मिशन पुणे महानगरपालिका, ५० नगरसेवक निवडून आणण्याचे सेनेचे आदेश
* ३६ हजार गावठाणांची होणार ड्रोनद्वारे मोजणी, जानेवारीत राय सरकार घेणार २० ड्रोन
* जीएसटीच्या स्लॅबमध्ये तुर्तास कुठलाही बदल नाही


Comments

Top