HOME   महत्वाच्या घडामोडी

गवळींच्या जागेसाठी नऊ अर्ज, नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड, पारसमल जैन माफीचा साक्षीदार, भाजपाकडून झारखंड गेले....२४ डिसेंबर १९


गवळींच्या जागेसाठी नऊ अर्ज, नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड, पारसमल जैन माफीचा साक्षीदार, भाजपाकडून झारखंड गेले....२४ डिसेंबर १९

* नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज लातुरात रॅली
* लातूर मनपा परिवहन समितीवर पुन्हा भाजपाचेच मंगेश बिराजदार सभापती
* नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या रिक्त जागेसाठी नऊ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
* विलास कारखान्याच्या निवडणुकीत चारजणांचे अर्ज ठरले अवैध
* लातुरच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, २५ डिसेंबरचा पाणी पुरवठा होणार नाही
* लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होणार ०६ जानेवारी रोजी
* जनतेच्या सूचनांना आदेश मानून काम करु- आ. संभाजी पाटील निलंगेकर
* तात्काळ दुष्काळी अनुदान द्या, संभाजीराव पाटील देणार जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
* लातूर मनपा हद्दीतील अवैध बांधकांच्या विरोधात अ‍ॅड. शोभा गोमारे करणार मनपासमोर लाक्षणिक उपोषण
* परळीत तरुणाने फोडला तोंडात सुतळी बॉंब, अंबाजोगाईत उपचार सुरु
* पवनराजे हत्या प्रकरणातील पारसमल जैन होणार साक्षीचा माफीदार
* झारखंडमधील सर्व ८१ जागांचे निकाल जाहीर, जेएमएम-काँग्रेस आघाडीला ४७ जागा, भाजप २५ जागांवर विजयी
* नाताळ आणि ३१ डिसेंबर दिवशी शहरातील हॉटेल आणि बिअर बार हे पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार
* उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर बोलणी
* २७ किंवा ३० डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
* पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जाण्याची चर्चा
* संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना पुणे जिल्हा बंदी
* मुंबईच्या भांडूप भागात शिक्षकानेच केला १६ वर्षीय विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला
* ठाकरेंवर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात महिला शिवसैनिकांनी केले जोडे मारो आंदोलन
* अमिताभ बच्चन यांना २९ डिसेंबर रोजी प्रदान केला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार
* लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मतात १८ टक्क्यांची घट
* ठाकरे सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला- देवेंद्र फडणवीस
* नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही- बाळासाहेब थोरात
* कुठल्याही धर्माच्या नागरिकत्वाला धक्का लागू देणार नाही- उद्धव ठाकरे
* नागरिकत्व कायदा: १५,३४४ सोशल पोस्टवर कारवाई
* पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार येणार पहिल्यांदाच एका मंचावर
* रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांची गती ३० टक्क्यांनी वाढणार
* देशभरात लवकरच मिथेनॉल मिश्रीत इंधन होणार उपलब्ध


Comments

Top