HOME   महत्वाच्या घडामोडी

गृहमंत्रीपदासाठी रस्सीखेच, ग्रहणामुळे मंदिरे बंद, पुणे मेट्रोची चाचणी, सेट परिक्षा जूनमध्ये, मंत्रीमंडळाचा विस्तार ३० ला.....२६ डिसेंबर २०१९


गृहमंत्रीपदासाठी रस्सीखेच, ग्रहणामुळे मंदिरे बंद, पुणे मेट्रोची चाचणी, सेट परिक्षा जूनमध्ये, मंत्रीमंडळाचा विस्तार ३० ला.....२६ डिसेंबर २०१९

* गृहमंत्रीपदासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात रस्सीखेच
* भारतात जन्मलेला प्रत्येकजण हिंदू- मोहन भागवत
* आज कंकणाकृती सूर्यग्रहण, शिर्डीसह अनेक मंदिरं राहणार बंद
* आठ वाजून चार मिनिटांनी सुरु होणार सूर्यग्रहण, दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
* सचिन तेंडूलकरसारख्या महान खेळाडूची सुरक्षा का कमी केली? राम कदम यांचा प्रश्न
* मुंबईत पकडली ११ लाखांची बनावट दारु
* पुणे मेट्रोची होणार जानेवारी महिन्यात चाचणी
* दक्षिण मुंबईत उभारल्या जाणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला विरोध
* औरंगाबाद, नाशिक आणि पुण्यात झाला अवकाळी पाऊस
* कर्जमाफीवरुन राजू शेट्टी असमाधानी, म्हणाले सरकारला वेगळ्या भाषेत सांगावे लागेल
* शेतकर्‍यांच्या दोन लाखांवरील कर्जाही होणार विचार- मुख्यमंत्री ठाकरे
* प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा सेट २१ जून २०२० रोजी होणार
* राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार; पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांची माहिती
* 'वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते' संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावरुन महिलात संताप
* कमी जागा असतानाही सरकार कसे स्थापन करावे हे शरद पवारांकडून शिकलो- उद्धव ठाकरे
* सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार दहा रुपयात जेवण
* ३० डिसेंबरला दुपारी दोनच्या आत होणार विस्तारीत मंत्रीमंडळाचा शपथविधी
* मराठवाड्याचा वॉटर ग्रीड प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता


Comments

Top