HOME   महत्वाच्या घडामोडी

मुंबईच्या मार्चमध्ये लातुरचे कार्यकर्ते, बेळगावात फोडल्या मराठी पाट्या, कर्नाटकात जाणार्‍या बसेस रद्द, रविना टंडनवर बीडमध्ये गुन्हा.....२९ डिसेंबर १९


मुंबईच्या मार्चमध्ये लातुरचे कार्यकर्ते, बेळगावात फोडल्या मराठी पाट्या, कर्नाटकात जाणार्‍या बसेस रद्द, रविना टंडनवर बीडमध्ये गुन्हा.....२९ डिसेंबर १९

* मुंबईच्या ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चमध्ये आ. अमित देशमुख यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यासह सहभाग
* निवळीच्या विलास कारखान्याच्या निवडणुकीत २१ पैकी २० जागा बिनविरोध
* २५ टक्के मोफत शिक्षणाच्या खर्चाचा वाटा सरकारने न दिल्याने लातूर जिल्ह्यातील इंग्रजी शाळा उद्या आणि परवा राहणार बंद
* निम्न तेरणा प्रकल्पातून उद्या शेतीसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडणार
* दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही
* दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा वेगळा विचार करणार
* मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर, राजकारण सुरु
* बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते, राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप
* मी भाजपातच राहणार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले स्पष्टीकरण
* बेळगावात कर्नाटक नवनिर्माण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
* सीमा प्रश्नावरुन वाद, कोल्हापुरातून कर्नाटकात जाणार्‍या सगळ्या बसेस रद्द
* बेळगावात कर्नाटकी आंदोलकांनी फोडल्या मराठी पाट्या
* उद्या महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विस्तार
* लखनौ पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा, गळा आवळण्याचा केला प्रयत्न, प्रियंका गांधी यांचा आरोप
* एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी
* पॅन आणि आधार कार्ड जोडणीसाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत
* थंडीमुळे काश्मीरातील दल सरोवर गोठू लागले
* विदर्भाच्या ब्रम्हपुरीत सर्वाधिक थंडी
* मुंबईतल्या १५ रेल्वे स्थानकांवर सौर उर्जेवर मोफत मोबाईल चार्जिंगची सुविधा
* मला संरक्षण नको, अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
* भारतात रहायचे असेल तर भातमाता की जय म्हणावेच लागेल- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
* उत्तर प्रदेशातील तलाक पिडीत महिलांना सहा हजार रुपयांची मदत मिळणार
* ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू
* ख्रिश्चन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेत्री रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्यावर बीडच्या पोलिसात गुन्हा दाखल


Comments

Top