HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात जल्लोष, अनिल देशमुख गृहमंत्री? पेट्रोल-डिझेल महागले, दोन दिवसात खातेवाटप, भिमा कोरेगावात मोठा बंदोबस्त, लवकरच फाईव्ह जी.....३१ डिसेंबर २०१९


लातुरात जल्लोष, अनिल देशमुख गृहमंत्री? पेट्रोल-डिझेल महागले, दोन दिवसात खातेवाटप, भिमा कोरेगावात मोठा बंदोबस्त, लवकरच फाईव्ह जी.....३१ डिसेंबर २०१९

* लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी सरस्वती पाटील, उप सभापतीपतीपदी प्रकाश उफाडे
* अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने लातुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
* आठ जानेवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
* दोन दिवसात होणार मंत्र्यांचे खातेवाटप
* राष्ट्रवादीमुळे खातेवाटप रखडले
* शिवसेनेच्या मंत्र्यात एकही महिला नाही
* मंत्रीमंडळात संधी न मिळाल्यानं मित्र पक्ष नाराज, राजू शेट्टी आणि जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केल्या भावना
* राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता
* दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी लवकरच नवी कर्जमाफी योजना
* परभणीत नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ निघाली रॅली
* परभणी, हिंगोलीत झाला अवकाळी पाऊस
* भिमा कोरेगाव येथे मोठा बंदोबस्त तैनात
* विना परवाना मटन विक्री करणार्‍या कोल्हापुरातील दहा दुकानांना लागले टाळे
* पेट्रोल आणि डिझेलच्या दरार १६ ते १८ पैशांनी वाढ
* पंतप्रधानांच्या निवासस्थानी लागलेली आग आली आटोक्यात
* पॅन कार्ड-आधार कार्ड आता मार्च २०२० पर्यंत करता येणार लिंक
* राष्ट्रवादीचे नाराज आमदार प्रकाश सोळंके आज राजीनामा देणार
* पहिल्यांदा निवडून येणार्‍यांना मंत्रीपद मिळते, चारवेळा निवडून आलेल्यांना संधी नाही- प्रकाश सोळंके
* मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणार्‍या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
* लवकरच सुरु होणार देशात फाईव्ह जी सेवा
* बिपीन रावत पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
* मनोज नरवणे आज लष्करप्रमुखाची सुत्रे स्विकारणार
* जम्मू काश्मिरातील अनेक भागात भूकंपाचे धक्के, तीव्रता ५.४ रिश्टर स्केल
* अमेरिकेनं इराकमध्ये केलेल्या हल्ल्यात २५ दहशतवाद्य़ांचा खातमा
* आगामी काळात कसोटी क्रिकेट सामना असेल चार दिवसांचा


Comments

Top