HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात पोलिसांचा स्थापनादिन, अब्दुल सत्तारांचा राजीनामा, अब्दुल सत्तार गद्दार- खैरे, फाशीचा निर्णय ०७ जानेवारीला, विधानपरिषदेसाठी २४ ला मतदान.....०४ जानेवारी २०२०


लातुरात पोलिसांचा स्थापनादिन, अब्दुल सत्तारांचा राजीनामा, अब्दुल सत्तार गद्दार- खैरे, फाशीचा निर्णय ०७ जानेवारीला, विधानपरिषदेसाठी २४ ला मतदान.....०४ जानेवारी २०२०

* आजलातूर न्यूज पोर्टल कालपासून झाले होते हॅक
* मंत्रालयातील कार्यालये आणि सरकारी बंगले वाटपावर बच्चू कडू नाराज, स्मशानात जाऊन करणार कामे!
* महाराष्ट्र मंत्रीमंडळाचे खातेवाटप अद्याप अनिश्चित, आजही जाहीर झाले नाही
* खातेवाटपाचा गुंता सुटल्याचा दावा
* अमित देशमुख यांना लातुरचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता
* राज्यमंत्री अब्दुल सत्तार नाराज, दिला राजीनामा, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
* अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत, त्यांना मातोश्रीची पायरीही चढू देणार नाही- चंद्रकांत खैरे
* लातुरचे ६० विद्यार्थी जाणार इस्रोच्या भेटीला
* महिलांनी इंटरनेट वापरताना आपली ओळख जाहीर करु नये, अहमदपुरच्या कार्यशाळेत पोलिसांचे आवाहन
* नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिली लातुरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याला भेट
* लातूर मनपाला थकित वीज बील भरण्यासाठी मिळाली दोन आठवड्यांची मुदत
* दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपींच्या फाशीचा निर्णय होणार ०७ जानेवारीला
* २६ जानेवारीपासून महाराष्ट्रभर सुरु होणार १० रुपयात जेवण
* नागरिकता कायदा मागे घेणार नाही, अभ्यास नसेल तर चर्चेला या- अमित शाह
* सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये झाली निदर्शने
* औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी आज होणार पुन्हा मतदान
* धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी २४ जानेवारी रोजी मतदान
* कामगार संघटनांच्या देशव्यापी संघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे राजकीय पक्ष संपात सहभागी होणार
* राज्यघटनेच्या सरनाम्यातून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द वगळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नंदकुमार यांची मागणी
* इलेक्ट्रीक वाहनांसाठी देशातील ६२ शहरांमध्ये २,६३६ चार्जिंग स्टेशन्स उभारणार, केंद्राची मंजुरी
* मानधन कमी द्या पण बारा महिने काम द्या, होमगार्ड्सची मागणी
* होमगार्डसना वर्षातील सहा महिनेच काम मिळते
* एकनाथ खडसेंचे तिकीट केंद्रीय समितीने कापले होते, गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
* मोदी सरकारच्या योजनांना विरोध केल्यास महाराष्ट्राचे सरकार उलथवून टाकू- देवेंद्र फडणवीस
* पाकिस्तानात पवित्र गुरुद्वारावर दगडफेक, शिखांना हाकलून शहराचे नाव गुलाम मुस्तफा ठेवण्याची कट्टरवाद्यांची धमकी


Comments

Top