HOME   महत्वाच्या घडामोडी

नवे आयुक्त दिवेगावकर होणार उद्या जॉईन, महिलांच्या सन्मानात वाढ, महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न अजून कायम........०८ मार्च २०१८


नवे आयुक्त दिवेगावकर होणार उद्या जॉईन, महिलांच्या सन्मानात वाढ, महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न अजून कायम........०८ मार्च २०१८

* लातूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर उद्या घेणर कारभार हाती
* वर्षभरात महिलांना आधीपेक्षा मिळाला अधिक मान- माहिती सहाय्यक संचालक मिरा ढास
* महिलांच्या स्वच्छतेचे प्रश्न अजूनही कायम- आशाताई भिसे
* मर्दांनी केली केरळात गांधी पुतळ्याची विटंबना
* ६० तासात पाच राज्यात पुतळ्यांची विटंबना
* औरंगाबादचा कचरा खदान भागात टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
* आणीबाणीच्या सत्याग्रहींना देण्यात येणार्‍या पेन्शनची महिनाभरात ठरणार रक्कम - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
* शिवस्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप खोटा, शिवस्मारकाची उंची २१० मीटरच असेल- सुधीर मुनगंटीवार
* धर्मांतर केल्यानंतरही मुलीचा पालकांच्या मालमत्तांवरील वारसा हक्क अबाधित- उच्च न्यायालय
* दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशनवर साखर न देण्याचा राज्य शासनाचा निर्णय
* आरक्षित जागेत निवासस्थान बांधल्याचा ठपका ठेवत सहकार मंत्र्यांना १७ मार्चला सोलापूर मनपात हजर राहण्याचे आदेश
* विदर्भातील जंगलात ४८ तासात ०७ वाघांचा मृत्यू
* सरकारचे वाघांकडे दुर्लक्ष, वाघ शब्दाबाबत सरकार गंभीर नाही, वाघ चिन्ह असलेल्यांचेही दुर्लक्ष- धनंजय मुंडे
* बालगुन्हेगारी कायद्याची माहिती व्हावी, मुलांमध्ये जागृती येण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात बालगुन्हेगारी कायद्याचे धडे - मुख्यमंत्री
* मुंबई कोकणाला जोडणारा सायन-पनवेल महामार्ग अमेरिकेतील रस्त्यांसारखा बनविल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा
* नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आवाज उठविणाऱ्या कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी, गुन्हा दाखल
* नगर येथे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी
* भाजप सरकार जातीयवादी, मोदी-रमणसिंह-फडणवीस यांच्या जातीय धोरणाचा विरोध करा- गडचिरोलीत नक्षलवाद्यांची पत्रके
* एकवेळ मंत्रिपद सोडेन, पण कोकणातील जनतेच्या पाठीशी उभा राहीन- सुभाष देसाई
* केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ०२ टक्क्यांची वाढ
* जगभरातील श्रीमंतांच्या यादीत २५६ महिला, स्वप्रयत्नांनी श्रीमंत झालेल्या ७२ महिला
* ५० कोटी आणि त्यापेक्षा अधिकची कर्जे घेतलेल्यांचे पासपोर्ट तपशील ४५ दिवसांत घ्या- अर्थ मंत्रालय बँकांना
* पुतळ्यांचे संरक्षण करण्याचे सर्व राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले निर्देश
* स्टेट बँकेला जानेवारी ते मार्च तिमाहीत २० हजार कोटींचा करावा लागणार अतिरिक्त तोटा सहन
* एनसीईआरटीचा अभ्यासक्रम करणार निम्मा- प्रकाश जावडेकर
* कथित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक, आणखी चार साक्षीदार फितूर, फितूर साक्षीदारांची संख्या ४२
* छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ०२ बीएसएफ जवान शहीद
* कार्ती चिदंबरम यांची नार्को चाचणी करण्याची मागणी
* प्रकाश जावडेकर महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभेचे उमेदवार
* विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता- हवामान विभाग
* रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचे पुत्र राहुल कोठारी यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
* समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी
* कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप झालेल्या वेगवान गोलंदाज महंमद शमीचा वार्षिक करार रोखला बीसीसीआयने


Comments

Top