HOME   महत्वाच्या घडामोडी

लाल त्सुनामीपुढे वाकले सरकार!

लातुरात समर्थन, शेतकरी-कामगारांचे आंदोलन यशस्वी, कर्जमाफी नव्हे लूटमाफी.......१२ मार्च २०१८


लाल त्सुनामीपुढे वाकले सरकार!

* मुंबईतील शेतकरी आंदोलन यशस्वी, सरकारने मान्य केल्या सगळ्या मागण्या
* संपूर्ण कर्जमाफीचा एक टप्पा मान्य २००१ पासून मिळणार लाभ, आंदोलक म्हणतात ही कर्जमाफी नव्हे, लूटमाफी!
* संजय गांधी आणि इंदिरा गांधी योजनातील मदत किमान दोन हजार होणार
* मोर्चेकर्‍य़ांच्या मागण्या मंजूर केल्याचे सरकारचे लेखी आश्वासन
* वनहक्क कायद्याची अमलबजावणी होणार
* दुधाचे भाव नव्याने ठरवणार
* राज्य कषी मूल्य आयोग शेतमालाचे नव्याने हमीभाव ठरवणार, किसान सभेचे दोन प्रतिनिधी आयोगावर घेणार
* सगळ्या मागण्या मान्य, हा शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय, लाल आंदोलनाला, भगवा सलाम- मंत्री एकनाथ शिंदे
* आदिवासींना मिळणार किमान चार हेक्टरचे वनक्षेत्र
* एखाद्या प्रकल्पासाठी आदिवासींचे विस्थापन करणार नाही
* उद्या विधीमंडळात मुख्यमंत्री करणार सगळ्या निर्णयांची घोषणा
* कपील पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांची भाषणे, २५ वर्षातलं पहिलं यशस्वी आंदोलन, महाजनांनी केला मानाचा मुजरा
* आधीच्या घडामोडी.....
* मुंबईतल्या लाल मोर्चाला लातुरात समर्थन तहसीलसमोर निदर्शने
* उदय गवारे, रवींद्र जगताप, रामराव गवळी, सत्तार पटेल, डॉ. विठ्ठल मोरे, प्राचार्य मुंडे यांने केले नेतृत्व
* लाल वादळ आज घालणार होते विधान भवनाला घेराव
* शेतकर्‍यांच्या मोर्चाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा
* किसान मोर्चात शरद पवार, तटकरे आणि मुंडे
* शेतकर्‍यांची किंमत फक्त निवडणुकीपुरती- राज ठाकरे
* शेतकर्‍यांचा मोर्चा डावा किंवा उजवा नसतो- राज ठाकरे
* शेतकरी आंदोलनाला पूनम महाजन यांनी दिलं माओवादी नाव!
* मोर्चेकर्‍यांनी विधान भवनापर्यंत येऊ नये यासाठी प्रचंड बंदोबस्त, संघर्ष होण्याची शक्यता
* लाल वादळाच्या मोर्चात मंत्री गिरीष महाजनही सहभागी
* ही तर महाजनांची नौटंकी- अजित पवार
* लाल वादळातले सैनिक सरकारच्या लेखी आश्वासनासाठी आग्रही
* मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडावा मोर्चेकरी शेतकर्‍यांशी चर्चा करावी- पृथ्वीराज चव्हाण
* मागण्या मान्य करा, अन्यथा गोळ्या घाला, झेलायला तयार- लाल वादळातील मोर्चेकर्‍यांचा निर्धार
* १६० किलोमीटर चालल्याने अनेक शेतकरी आजारी, आझाद मैदानावर उपचार सुरु
* १५०० पेक्षाही शेतकर्‍यांवर आझाद मैदानावर उपचार
* लाल मोर्चाच्या प्रतिनिधींशी सरकार आज चर्चा करणार
* मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, मुंबईतल्या लाल मोर्चातील सैनिकांचा निर्धार
* मोर्चातील शेतकर्‍यांना मुंबईकरांची मदत, अन्न-पाणी-अंथरुण-पांघरुण आणि औषधांची मदत
* किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर बैठक, सहा मंत्र्यांची समिती नियुक्त
* आजवरचे सर्वात लबाड सरकार- मोर्चेकर्‍यांचे नेते विश्वनाथ देशमुख
* अनेक मागण्या मान्य, पण सगळ्या कागदावर, सरकारला काहीच करायचं नाही, आंदोलन ठलयाप्रमाणेच होणार- मोर्चेकरी
* लाल मोर्चात १० हजार पेक्षाही अधिक शेतकरी सहभागी
* विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी मोर्चेकर्‍यांनी घेतली काळजी
* खिसे फाटलेले सरकार तुम्हाला काय देणार?- राज ठाकरे
* राज ठाकरे आझाद मैदानावर आंदोलक शेतकर्‍यात सामील
* आज किसान सभेची जाहीर सभा
* शेतकर्‍यांचा आक्रोश सरकार उधळून लावेल- शिवसेना
* मोर्चेकर्‍यात नव्वद टक्के आदिवासी, सरकारचा दावा
* आदिवासींच्या नावावर वन जमिनी करण्यास सरकार सशर्त तयार
* ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी
* भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी
* यवतमाळमध्ये एका विहिरीत सापडली शेकडो आधारकार्डे, पोस्टमनने वितर्ण केलेच नाही
* लातुरचे पत्रकार-संपादक रवींद्र जगताप यांचेही आधार कार्ड सापडले होते पोस्टासमोरच्या रस्त्यावर


Comments

Top