HOME   महत्वाच्या घडामोडी

कालची दगडफेक किरकोळ एक तासाचा तमाशा, रिकाम्या दुधाच्या पिशव्या अन पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मिळणार परत, आता अण्णांचे देशव्यापी शेतकरी आंदोलन, पाऊस कमी, मराठा आरक्षण अभ्यासकाला काळे....१७ मार्च २०१८


कालची दगडफेक किरकोळ एक तासाचा तमाशा, रिकाम्या दुधाच्या पिशव्या अन पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मिळणार परत, आता अण्णांचे देशव्यापी शेतकरी आंदोलन, पाऊस कमी, मराठा आरक्षण अभ्यासकाला काळे....१७ मार्च २०१८

* कालची दगडफेक मोजकीच, मोजक्याच लोकांनी केली, काही मिनिटेच दुकाने बंद, लगेच झाली सुरु एक तासाचा तमाशा
* भाव कोसळल्याने औसा तालुक्यातील भाद्यात शेतकर्‍यांनी दोन एकरातील टोमॅटोची झाडे फ़ेकली उपटून
* लातूर बस आगारात लांब पल्ल्याच्या मार्गासाठी २२ शिवशाही झाल्या दाखल
* कापसावरील बोंड अळीमुळे लातूर जिल्ह्यात झाले २३ कोटींचे नुकसान
* लातूर एमआयडीसीत मनपा शासन आणि मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारणार ०५ मेगा वॅट वीज निर्मितीचा प्रकल्प
लातुरात सोमवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा युवा आक्रोश मोर्चा
* एका वर्गात ०५ कॉप्या मिळाल्यास पर्यवेक्षकावर होणार कारवाई, केंद्र ठरणार उपद्रवी केंद्र- लातूर परिक्षा महामंडळ
* सेवेत पूर्ववत घेऊन पगार काढा, लातुरच्या पिपल्स उर्दू प्राथमिक शाळेचे सेवक विनायक जाधव यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
* लातूर जिल्हा कृषी महोत्सवाचे २४ मार्चला आयोजन
* राज्यासह देशभरातील १२ अणु उर्जा प्रकल्पांना मंजुरी
* सरकारी कर्मचार्‍यांना मिळणारी २० लाखापर्यंतची ग्रॅच्युईटी झाली करमुक्त
* चारा घोटाळ्याशी संबंधित चौथ्या प्रकरणाचा आज निकाल, लालुप्रसाद, जगन्नाथ मिश्रांसह ३१ जण आरोपी
* राष्ट्रगीतातील ‘सिंध’ शब्द वगळून ईशान्य भारतचा उल्लेख करा- कॉंग्रेस खासदार रिपून बोरा
* भोंदू बाबांच्या तिसर्‍या यादीत वक्रपाणी, आचार्य प्रमोद यांचा समावेश
* जून नंतर प्रशांत महासागरात एल निनो स्थितीमुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
* राज्यात सुगंधी सुपारी आणि सुगंधीत तंबाखूवरील बंदी कायम राहणार
* दुधाच्या पिशव्या आणि प्लास्टीक बाटल्या परत करणार्‍या ग्राहकांना मिळणार अनुक्रमे ५० पैसे आणि एक रुपया
* मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी, गारपीटीचा इशारा, अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू धोक्यात
* औरंगाबादचे मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांची वैधानिक विकास महामंडळात बदली
* औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना फासले काळे
* भाजप किंवा संघाचा नाही तर सर्वपक्षीय समर्थक, कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधिल नाही- रामदेवबाबा, सोलापुरात
* सोनिया गांधी, राहुल गांधींनी योग शिबिरासाठी निमंत्रित केले तर आनंदाने जाऊ- रामदेवबाबा
* वेतनवाढीसाठी एसटी कामगारांनी दिवाळीत केलेला संप बेकायदेशीरच- औद्योगिक न्यायालय, लातूरच्या कामगार न्यायालयाचाही होता हाच निर्णय
* राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेला ३२ वर्षे पूर्ण, या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यभर सोमवारी अन्नत्याग आंदोलन
* कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यात साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह केली होती आत्महत्या
* शेतकऱ्यांच्या प्रश्नावर २३ मार्चपासून सत्याग्रह, ०५ राज्यातील शेतकरी संघटनांचा सहभाग- अण्णा हजारे
* अल्पसंख्याक विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा एकनाथ खडसे यांचा आरोप, सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे का?-खडसे
* धनंजय मुंडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी देणारा भिवंडीचा अन्न सुरक्षा अधिकारी निलंबित- गिरीश बापट, विधान परिषदेत
* शेतकर्‍यांना लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीतील व्याज न आकारण्याच्या बँकांना सूचना
* राज्यात चार लाख बेकायदेशीर खाजगी रिक्षा नियमित करण्यासाठी गरज पडल्यास मूदत वाढविणार- दिवाकर रावते, विधान परिषदेत
* हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी एकत्रच लढू- मुख्यमंत्री, भाजपने घेतलेला निर्णय एकतर्फीच- शिवसेना
* पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने डोक्यात बॅट घालून केल्याचे उघड
* मोबाइल कंपन्यांमधील कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढून त्याची विक्री केल्याप्रकरणी अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकींच्या वकीलाला अटक
* प्राथमिक शिक्षणाचे व्यापारीकरण करून खाजगी कंपन्यांच्या हातात शिक्षण सोपवण्याचा सरकारचा मानस- शिक्षक भारतीचे कपिल पाटील
* राज्य सरकार स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे सुधारणा विधेयक आणत आहे- कपिल पाटील, विधान परिषदेत
* भाजप पक्षस्थापना दिनाचे औचित्य साधून ०६ एप्रिलला मुंबईतल्या बीकेसी मैदानावर घेणार महामेळावा
* पुणे नगर रस्त्यावरील सीएनजी पंप चालविण्याची जबाबदारी टाकणार महिलांवर- एमएनजीएल'
* मुंबईतील नव्या बांधकामांना सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी, देवनार आणि मुलुंडला कचरा टाकण्यावर बंदी कायम
- मटा सन्मान:
* सर्वोत्कृष्ट अभिनेता नाटक विभाग- भरत जाधव, अभिनेत्री - ऋतुजा बागवे
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट विभाग)- इरावती हर्षे, सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही मालिका)- सचित पाटील , अभिनेत्री- मुक्ता बर्वे
* सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक- संगीत देवबाभळी, चित्रपट- रिंगण, टिव्ही मालिका रुद्रम
* पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार
* सातारा जिल्ह्यात सराफाची आत्महत्या, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यवसाय उध्द्वस्त झाल्याची फेसबुकवर पोस्ट
* नेटबँकिंगच्या सुविधेवर सायबर सुरक्षेचे प्रमुख गुलशन राय यांचे प्रश्नचिन्ह, पुरेशी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
* न्या. बी. एच. लोया मृत्यूप्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून
* देशभरातील पदवी अभ्यासक्रमाचा तीन वर्षांचा कालावधी चार वर्षांचा करण्याचा केंद्राचा विचार
* नरेंद्र मोदींमुळे राफेल विमानांच्या खरेदी करारात ३६ हजार कोटींचे नुकसान, सगळा पैसा गेला केंद्र सरकारच्या खिशात- राहुल गांधी यांचे ट्विट
* मृत्यूनंतर अवयव दान करण्याची घोषणा, कानपूरच्या मुस्लीम प्राध्यापक विरोधात फतवा, मानसिक त्रास देत असल्याची तक्रार
* दिल्लीत कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणीचे रॅकेट चालवणाऱ्या डॉक्टरला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक
* निर्भयाची आई या वयातही इतकी चांगली तर निभर्या किती सुंदर असेल?- कर्नाटकचे माजी डीजीपी
* पुरूषांनी जबरदस्ती केली तर शरण जा, आधी सुरक्षित राहा, जीव वाचवा, मग त्याला पोलिसांत, कोर्टात खेचा- कर्नाटकचे माजी डीजीपी
* अभिनेता इरफान खानला 'न्युरोएन्डोक्राईन ट्युमर', परदेशात घेणार उपचार
* दिल्‍लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापकाविरोधात छेडछाडीचा गुन्‍हा दाखल
* जगभरातील ९० टक्के बाटलीबंद पाण्यात आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण, ०९ देशांतील ११ मोठ्या ब्रँडचा समावेश- संशोधन
* टी-२० तिरंगी मालिका: बांगलादेशने श्रीलंकेचा ०२ गडी राखून केला पराभव, अंतिम लढत भारताबरोबर
* ऑल इंग्लंड ओपन: पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत दाखल


Comments

Top