logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   लातूर न्यूज

स्टेप बाय स्टेपमध्ये अंत्यदर्शन, खाड्गाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

दोघांची काल झडती, आज आणखी दोघांची सुरु, पण दुजोरा नाही

स्टेप बाय स्टेपमध्ये अंत्यदर्शन, खाड्गाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

लातूर: खाजगी शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण यांचं शव अजूनही सरकारी दवाखान्याच्या शवागारातच आहे. काल त्यांच्या समाजाचे नेते विजय चौगुले लातुरात आले. आज सकाळपासूनच त्यांच्या समाजातील शानिक मान्यवर मंडळी आणि चौगुले यांची बैठक चालू आहे. काल रा्त्री पोलिस अधिकार्‍यांनी शवागाराच्या परिसरातच राहुट्या ठोकून मुक्काम केला. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अविनाशचे शव बाहेर काढले जाईल. ते पुढे स्टेप बाय स्टेपच्या मुख्य कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास खाडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान पोलिसांची कारवाईही गतीने सुरु असून दोघाजणांची चौकशी केली जात आहे. रात्रीतून आणखी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचीही झाडाझडती घेतली जात आहे अशी माहिती मिळाली पण त्याला दुजोरा मिळाला नाही.


Comments

Top