HOME   लातूर न्यूज

अविनाशच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा सापडला

केजहून आणले होते पिस्तूल, रमेश मुंडेला सहा दिवसांची कोठडी


अविनाशच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा सापडला

लातूर: अविनाश चव्हाण याच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा पोलिसांच्या हाती लागला असून यामुळे या गुन्ह्याची उकल होण्यास आणखी मदत होणार आहे. पिस्तूल विकणार्‍या आरोपीला सहा दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल केज येथील रमेश श्रीमंत मुंडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. २४ जूनच्या मध्यरात्री अविनाश चव्हाण याचा घराच्या मार्गावर गोळ्या घालून खून झाला होता. यात पोलिसांनी ३६ तासातच पाच आरोपींना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल केज शहरातून दीड लाख रुपयांना विकत घेण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे पिस्तूल विकणार्‍या केज येथील राहणार्‍या रमेश मुंडे यास लातुरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यास सहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी रमेश मुंडे याने आपणच पिस्तूल दिल्याचे कबूल केले असल्याचे अपर अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले. अविनाश चव्हाण हत्येसाठी पिस्तूल विकणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने पिस्तूल नेमके कोणाला विकले होते व आणखी कोण आरोपी आहेत याची माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Comments

Top