logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   लातूर न्यूज

भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे

भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे

लातूर: भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. भाजपा व परिवारात एकनिष्ठेने कार्यरत असलेले प्रविण कस्तुरे हे अवघ्या जिल्हाभरात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रविण कस्तुरे यांनी भाजपासह परिवारात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव या पदासाठी योग्य असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रविण कस्तुरे यांना देण्यात आलेले आहे. प्रविण कस्तुरे यांनी समन्वयक म्हणून भाजपा शहर, परिवार व महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे काम पार पाडणे अपेक्षीत आहे. प्रविण कस्तुरे यांना सदर नियुक्ती पत्र देतांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, मंडल प्रमुख रवि सुडे, राजकुमार अकनगिरे, पप्पू धोत्रे, ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रविण कस्तुरे यांना सदर जबाबदारी यशस्वी पार पाडावी अश्या शुभेच्छा देऊन या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक मजबुत करावी अशा सूचना केल्या. या निवडीबद्दल मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रविण कस्तुरे यांचे अभिनंदन केले आहे.


Comments

Top