HOME   लातूर न्यूज

भुसणी बॅरेज जवळ ऑटोरिक्षा लावून आत्महत्या


भुसणी बॅरेज जवळ ऑटोरिक्षा लावून आत्महत्या

लातूर: बाभळगाव - भुसणी रोड वरील नदीच्या पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत आहे व तो मृतदेह भुसणी बॅरेज (तालुका औसा) च्या दिशेने वाहत असून अंगात गुलाबी रंगाचा शर्ट आहे. त्याचे अंदाजे वय ४० वाटते. पुलावर नागरिकांची गर्दी झाली होती. परवा रात्री पासून ही व्यक्ती घरातून बाहेर होती. काल सायंकाळी सहाच्या सुमारास भुसणी येथील काही शेतकऱ्यांना एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीचे नातेवाईक घटनास्थळी संध्याकाळी ०७ वाजता दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटली आहे मृत व्यक्तीचे नाव मारोती रामकिशन वागळगावे असे आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात आहे याबद्दल तर्क लावले जात आहेत.


Comments

Top