HOME   लातूर न्यूज

कडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त

लातूर शहरातील सगळा बाजार, शाळा-महाविद्यालये बंद


कडकडीत बंद, त्याला जबरदस्त बंदोबस्त

लातूर: गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत आत्महत्या केल्याने महाराष्ट्रातील मराठा बांधव अस्वस्थ झाला आहे. त्याचमुळे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. लातूर येथे या बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला. सकाळी लवकरच कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या भागातून बंदचे आवाहन करणार्‍या फेर्‍या काढल्या. आधीच अर्धाधिक बाजार, दुकाने होती. त्यात कार्यकर्त्यांच्या आवाहनामुळे शहर पूर्णपणे बंद झाले. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. बार्शी मार्गावर महिला तंत्रनिकेतच्याही पुढे बंदचा प्रभाव दिसला. अशीच अवस्था तीनही प्रमुख मार्गावर होती. शिवाजी चौकात डेपोतून बाहेर पडणार्‍या बसेस आवाहनकर्त्यांना पाहून माघारी फिरल्या. या निमित्ताने रात्रीपासून काळजी घेणे सुरु केले होते. संवेदनशील भागांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होती. काही किरकोळ प्रकार वगळता बंद यशस्वी झाला.


Comments

Top