HOME   लातूर न्यूज

पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

परळीकडे जाताना रमेश कराड यांच्या निवासस्थानी दिली भेट


पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

लातूर: राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांचा वाढदिवस रमेशअप्पा कराड यांच्या येथील प्रयाग निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. लातूर विमानतळावरुन परळीकडे जात असताना पंकजाताई मुंडे यांनी रमेशअप्पा कराड यांच्या लातूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आग्रह करुन त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी रमेशअप्पा कराड व सौ. संजिवनी कराड यांनी पंकजाताई मुंडे यांचे शाल व शुष्पहार देवून स्वागत केले. तसेच याप्रसंगी लातूर जिल्हयातील भाजप कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी पंकजाताईंना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान लातूरवरुन पानगावकडे जात असताना रेणापूर येथील आराध्यदैवत आदिशक्ती रेणुका देवी मंदिरात जावून पंकजाताई मुंडे यांनी दर्शन घेतले व देवीची आरती केली. तसेच यावेळी रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या रेणापूर शहरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखाना येथे वाढदिवसानिमीत्त कारखाना परिसरात पंकजाताईं मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लातूरवरुन पानगावकडे जात असताना ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी गाडयांचा ताफा अडवून पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. प्रितम मुंडे-खाडे, आमदार संगिता ठोंबरे, अमित पालवे, श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, महिला व बालकल्याण सभापती सौ. संगिताताई घुले, रेणापूर पंचायत समिती सभापती अनिल भिसे, अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती आयोध्याताई केंद्रे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, उपसभापती अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, अशोक केंद्रे, महेश पाटील, राहुल केंद्रे, राजकुमार कांबळे, उषाताई रोडगे, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अमोल पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, रेणापूर भापचे तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे,
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नरसिंग येलगटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ललिता हानवते-कांबळे, डॉ. बाबासाहेब घुले, संगायो समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकिशन जाधव, पंचायत समितीचे गटनेते रमेश सोनवणे, पंचायत समिती सदस्य संध्या पवार, भैरवनाथ पिसाळ, लातूर ग्रामीणचे विस्तारक दिलीप पाटील, वसंत करमुडे, संतोश चव्हाण, श्रीकृष्ण पवार, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, गणेश जाधव, धनंजय म्हेत्रे, विठ्ठल कसपटे, शाम वाघमारे, दिलीप धोत्रे, हनुमंत नागटिळक, राजकिरण साठे, शिवसिंह सिसोदिया, आनंद कोरे, मोहन माने, बाबुराव खंदारे, विक्रम शिंदे, तात्याराव बेद्रे, ज्ञानोबा केंद्रे, संजय पाटील, शामसुंदर वाघमारे आदींसह लातूर, रेणापूर, औसा तालुक्यातील व लातूर जिल्हयातील भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


Comments

Top