HOME   लातूर न्यूज

देशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर

श्रध्देय आदर्श नेतृत्व हरपले: पालकंमत्री संभाजी पाटील


देशाचं पितृतुल्य नेतृत्व गमावले: रुपाताई निलंगेकर

लातूर: देशाच पितृतुल्य नेतृत्व गमावले असल्याच्या भावना माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली. श्रध्दांजली अर्पण करताना माजी खासदार रुपाताई पाटील म्हणाल्या की, आज मला काय भावना व्यक्त कराव्यात हे समजत नाही. मी त्यांच्या सोबत राहिले, काम केले ते माझं भाग्य होत त्यामुळे मी त्यांना कोटी कोटी आंदरांजली अर्पण करीत आहे. कारण आज आपण देशाच पितृतुल्य नेतृत्व गमावले आहे.
श्रध्देय आदर्श नेतृत्व हरपले
भारतरत्न माजी पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी बाजपाई यांच्या सारखे नेतृत्व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी आदर्श मानून मी काम करीत आहे. विद्यार्थ्यी दशेपासुन त्यांच्या कार्याचा, वाणीचा, आदर्श समोर ठेउन वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पाहिल्या नंतर जो भाव निर्माण होत होता तो शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. माननीय आक्का सोबत त्यांना दोनवेळा भेटण्याचे भाग्य मला लाभले. अटलबिहारी सारखे श्रध्देय नेतृत्व हरपले असुन त्यांच्या निधनाने देशात आणि पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात राज्याचे कामगार तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अटलबिहारी बाजपाई यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.


Comments

Top