logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   लातूर न्यूज

भारत बंदमध्ये ११९ पेट्रोल पंपावर काँग्रेसचा कार्यकर्ता असावा

लातूर लोकसभेत काँग्रेसचाच विजय निश्चित

भारत बंदमध्ये ११९ पेट्रोल पंपावर काँग्रेसचा कार्यकर्ता असावा

लातूर : जनतेचा भाजपा सरकार विषयीचा असलेला संताप मतपेटीपर्यंत पोहचवून देशात परिवर्तन घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले. जिल्हा आणि शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवड्णूक आणि सोमवरच्या भारत बंद कार्यक्रमाबाबत त्यांनी कायकर्त्याना मार्गदर्शन केले. काँग्रेसचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले तर लातूर लोकसभेत काँग्रेसचाच विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारत बंद आंदोलन व्यापक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ११९ पेट्रेाल पंपावर काँग्रेसचा कार्यकर्ता असावा आंदोलन शांततेत व्हावे, सामान्य माणसांच्या अडचणीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून सामान्यांना आधार द्यावा असे आवाहन अमित देशमुख यांनी केले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. सत्ताधीश भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हूकुमशाही पध्दतीने वागत असल्याने जनतेत शासनाबददल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यासाठी सत्ता परिवर्तन होण्याची गरज आहे. सर्व यंत्रणांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची लवकरच कार्यशाळा घेतली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.
या बैठकीस भा. ई. नागराळे, अशोक पाटील निलंगेकर, अमर खानापुरे, ॲड. विक्रम हिप्परकर, ॲड.व्यंकट बेद्रे, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, मोईज शेख,अशोक गोविंदपूरकर, दीपक सूळ, सपना किसवे, विद्या पाटील, सुनिता आरळीकर, प्रा. स्मिता खानापूरे, दगडू पडिले, रफीक सय्यद, फारुख शेख, शामराव सूर्यंवंशी, मन्मथअप्पा किडे, पृथ्वीराज सिरसाट, शिवाजी कांबळे, संजय निलेगावकर, विक्रांत गोजमगुंडे, प्रविण पाटील, बाबासाहेब गायकावाड, प्रा. राजकुमार जाधव, शास्त्री चव्हाण, विजयकुमार पाटील, दत्तात्रय बनसोडे, बालाजी कांबळे, समद पटेल, हमीम शेख, अमर मोरे, लालासाहेब चव्हाण, उषा कांबळे, शंकर गुट्टे, प्रा. गोविंद घार, अ‍ॅड. देविदास बरुळे, सिकंदर पटेल, विजय देशमुख, श्रीनिवास शेळके, अविनाश बट्टेवार, शिवाजी जवळगेकर, अशोक देडे, विजय अजनीकर, रत्नदीप अजनीकर उपस्थित होते.
१४ सप्टेंबरला रेणापूरमध्ये दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
रेणापूर येथे १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सभा होणार आहे. यासभेत माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दिलीपराव देशमुख यांचा शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार होणार आहे. यासभेस जास्तीत जास्त काँग्रस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले.


Comments

Top