HOME   लातूर न्यूज

वीज जोडणीसाठी गणेश मंडळाना आवाहन

अधिकृत वीज कंत्राटदाराकडूनच वीजयंत्रणा घेण्याच्या सूचना


वीज जोडणीसाठी गणेश मंडळाना आवाहन

लातूर: येथील सार्वजनिक गणेश मंडळानी तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करुन घेऊन वीजसुरक्षेबाबत गांर्भीयाने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणने केले आहे. या काळातला वीज दर ०४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट असणार आहे.
तात्पुरत्या वीज जोडणीच्या बिलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रकमेतील उर्वरीत रकम गणेश मंडळाना त्वरित परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयाना देण्यात आलेले आहे.
उत्सवासाठी लागणारी वीजयंत्रणा अधिकृत वीज कंत्राटदाराकडूनच घ्यावी. तसेच अर्थिंगचीही खबरदारी घ्यावी असे महा वितरणे कळविले आहे. वायरींगची वायर वीजभारासाठी सक्षम नसेल तर शॅाटसर्किटचा धोका निर्माण होतो. तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडपासाठी टिनपत्र्याचा वापर केला जातो त्यामुळे वायर लूज किंवा तुटलेली, टेपने जोडलेली असल्यास वीजपुवठा अपघाताची मोठी शक्यता असते. यासाठि गणेश मंडळाने याची काळजी घ्यावी असे महावितरणने कळविले आहे.
गणेशोत्सवास वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युटल घेणे अत्यावशक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटलमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्राचा गणेशत्सावातील आणि मिरवणूकीतील देखाव्याना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. मंडळानी वीजसुरक्षेच्या उपाययोजनेत तडजोड करु नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
तातडीच्या मदतीसाठी महावितरणने आपला टोल फ़्री क्रमांक दिलेला आहे. टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता आर.आर. कांबळे यांनी केले आहे.


Comments

Top