HOME   लातूर न्यूज

रस्ते खड्डेमुक्त करा- अमित देशमुख

मनपा आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे


रस्ते खड्डेमुक्त करा- अमित देशमुख

लातूर: शहरातील सर्वच रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. खड्डयामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी लातूर महानगर पालिकेने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी मनपा आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरींल खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनधारकांना अनेक शारीरीक व्याधीनी ग्रासले आहे. अपघाताचेही प्रमाणही वाढले आहे. वर्दळीच्या ठिकाणी खड्डयामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेवून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा असे पत्रात म्हणले आहे.
खड्डे बुजविण्यासाठी काँग्रेससह अनेक संघटनांनी आंदोलने केली. पण मनपा प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तत्परता दाखविली नाही. कांही ठिकाणी बुजविलेल्या खड्डयांचे कामही निकृष्ट झाले आहे. शहरातील रस्त्याची बिकट स्थिती लक्षात घेता मनपा आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे अशी सूचना अमित देशमुख यांनी पत्राव्दारे केली आहे.


Comments

Top