HOME   लातूर न्यूज

अश्‍वासन पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरु

बलुतेदार संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन


अश्‍वासन  पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरु

लातूर: नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अश्‍वासन राज्य शासनाने पूर्ण करावे अन्यथा बलुतेदार रस्त्यावर उतरतील असा इशारा बलुतेदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
भाजपा नेत्यांनी सत्तेवर आल्यास बलुतेदारांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. सत्तेवर येऊन त्यांना ०४ वर्षे झाली तरी बलुतेदारांच्या
प्रश्‍नाविषयी एकही शब्द त्यांनी काढला नाही असे निवेदनात म्हणले आहे.
राज्याच्या गाव गाड्यात बलुतेदारांचे मोलाचे योगदान आहे. आज त्यांची अत्यंत बिकट होत चालली आहे. त्यांचे व्यवसाय कालबाह्य होत आहेत.
त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. व्यवसाय करण्यासाठी त्यांना कोणतेच शासकीय पाठबळ नाही, व्यवसायासाठी जागा नाही.
या मायक्रो ओबीसी असलेला बलुतेदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्‍वासन भाजपाने दिले होते. त्यामुळे बलुतेदारांनी त्यांना भरभरुन मतदान केले. पण राज्य सरकारने बलुतेदारांच्या विकासाचा एकही निर्णय घेतला नाही. अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, प्रताप गडावर जिवाजी महाले व शिवबाकाशिद यांचे स्मारक, अमरावती येथे संत गाडगेबाबा यांचे स्मारक, बलुतेदारांसाठी स्वतंत्र आरक्षण, बलुतेदारांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद अशा मागण्या आहेत.
निवेदन सादर करताना भाऊसाहेब शिंदे, अशोक चमकुरे, अमोल सावंत, जगन्नाथ गवळी, दिनकर डिगे, आण्णा रघुनाथ सुरवसे, गोपीनाथ गवळी, संजय गायकवाड, नवनाथ सुरवसे, सुधाकर सूर्यवंशी, ज्ञानेश्‍वर मोरे उपस्थित होते.


Comments

Top