HOME   लातूर न्यूज

देशिकेंद्रच्या मुलांनी बनविल्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती

राबविली इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना


देशिकेंद्रच्या मुलांनी बनविल्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती

लातूर : येथील देशिकेन्द्र माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे.
रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं बनवण्याचा उपक्रम शाळेने राबविला.
गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणा‍ऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होते. त्यात जिप्सम, कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आदि घातक घटक आढळतात. यातील जिप्सम हा प्रमुख घटक अविघटनशील आहे आणि त्यामुळेच मूर्तीचे विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसबरोबर मूर्तीला लावल्या जाणा‍ऱ्या रंगांतही पारा, कॅडमियम, शिसे व कार्बन संयुगे असतात व ही बहुतेक सगळी जलचरांसाठी घातक असतात, असं सिद्ध झालं. त्यामुळे प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सामाजिक चळवळीत सहभाग म्हणून आम्ही शालेय पातळीवर इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना राबवली असे कला विभागाच्या वतीने कला शिक्षक वर्षा सांडे, श्रीमती वनिता भाताम्ब्रेकर व मनोज बनाळे यांनी संगितले. या उपक्रमात ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते.


Comments

Top