logo
news image लातुरच्या बीएसएनएल कर्मचार्‍यांचा तीन दिवसांचा संप news image लातूर प्रशासन लोकसभ निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार- जिल्हाधिकारी news image कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया news image सोन्याचा भाव ३४ हजार चारशे news image नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे लेखी माफी news image राजौरीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन news image हुरियतच्या दिडशे नेत्यांची सुरक्षा हटवली news image आजपासून बारावीची परिक्षा, १५ लाख परिक्षार्थी news image किसान सभेचा मोर्चा निघाला मुंबईकडे रवाना news image पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांना प्रचार सभा घेण्याचे कसे सुचते? शरद पवारांचा सवाल news image भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय news image पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिओल शांतता पुरस्कार news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला न देता इतर देशांना देणार news image २७ फेब्रुवारीला आयसीसीची बैठक news image अडीच वर्षे मुख्यमंत्री फॉर्म्युला वापरावा अन्यथा युती तोडावी- रामदास कदम news image पुण्याच्या आंबेगावात बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा मुलगा पडला, एनडीआरएफने वाचवला

HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेसच्या बुथ समन्वयकांची झाली कार्यशाळा

गतीने काम करणाऱ्या युवकांना प्राधान्य- अमित देशमुख

कॉंग्रेसच्या बुथ समन्वयकांची झाली कार्यशाळा

लातूर: केंद्रात आणि राज्यात परिवर्तन घडवायचे असेल तर कार्यकर्त्यांना योगदान देण्यासाठी पुढे यावे लागेल. आपल्यातील योग्यतेचा वापर पक्ष कामासाठी करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले. येथील गायत्री उत्सवमध्ये आयोजित केलेल्या लातूर विधानसभा बुथ समन्वयकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
मोठया अपेक्षेने ज्यांना निवडणून दिले त्यांनीच जनतेचा भ्रमनिरास केला आहे त्यामुळे लोक या सरकारला कंटाळले आहेत, परंतू एवढयावर समाधान मानून स्वस्थ बसणे उपयोगाचे नाही असेही देशमुख ठामपणे म्हणाले.
निवडणुका जशा दिसतात तशा नसतात. अत्यंत बारकाईने नियोजन करुन सहकार्यांना तांत्रिक दृष्टया सक्षम बनवून त्या लढवणे आता काळाची गरज बनली आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे. त्यासाठी गतीने काम करणाऱ्या युवकांना प्राधान्य दिले जाईल. पुढे होऊन काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असे देशमुख यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले.
देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूका केंव्हाही लागू शकतात. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या सूचनेप्रमाणेच या कार्यशाळेचे नियोजन केलेले आहे. लातूर लोकसभा निवडणूकीत काँग्रेसपक्षाचा उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने आपाल्याला सर्वांना परिश्रम घ्यावयाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कामाकडे दूर्लक्ष न करता, पक्षाला अधिकाधिक मताधिक्य या विधानसभा मतदार संघातून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेत २०१४ विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक माताधिक्य देणाऱ्या बुथ, प्रभाग व झोन मधील बुथ प्रमुख, झोन प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला व्यंकट बेद्रे, जगन्नाथ पाटील, ॲड.समद पटेल, प्रा.राजकुमार जाधव, अशोक गोविंदपूरकर, स्मिता खानापूरे, सपना किसवे आदी उपस्थित होते.


Comments

Top