HOME   लातूर न्यूज

लातुरच्या छाया साखरेंना मुंबई महापौर पुरस्कार


लातुरच्या छाया साखरेंना मुंबई महापौर पुरस्कार

लातूर: लातूर जिल्ह्याच्या कन्या संगीत शिक्षिका छाया साखरे यांना मुंबई महानगर पालिकेचा महापौर आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. गृह निर्माण व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री रविंद्र वायकर व मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. छाया साखरे कांदिवलीत समता नगर मराठी शाळेत संगीत शिक्षिका आहेत. त्या पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत.


Comments

Top