HOME   लातूर न्यूज

घरकुल योजनेकडे मनपाचे दुर्लक्ष ही खेदजनक गोष्ट - विक्रांत गोजमगुंडे

त्वरित सर्वेक्षण करा महापौरांकडे मागणी


घरकुल योजनेकडे मनपाचे दुर्लक्ष ही खेदजनक गोष्ट -  विक्रांत गोजमगुंडे

लातूर: प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी लातूर महानगर पालिकेतील निष्क्रिय सत्ताधारी पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. राज्यातील इतर मनपा याकामी पुढाकार घेत असताना लातूर मनपाने सर्वेक्षणही सुरु केलेले नाही ही खेदजनक गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया नगर सेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली. लातुरकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे कानाडोळा करत सत्तास्थाने उपभोगण्यात सत्ताधारी अडकले आहेत. ०६ महिन्यात या कामास सुरुवात झालेली नाही, घरकुलासाठी तातडीने सर्वेक्षण करून निधी मिळवून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी गोजमगुंडे यांनी महापौरांकडे केली आहे.
या घरकुल योजनेसाठी नागरिकांनी रीतसर अर्जही दखल केलेले आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या व स्वतःच्या मालकीची जागा असणाऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनास पाठविणे आवश्यक आहे. शासनाने या करिता केपीएमजी संस्थेची निवड केली आहे. सर्वेक्षणाचा खर्च शासन करणार आहे. २८ मार्च २०१८ रोजी शासनाने आदेश काढलेला असून अद्याप कामाला सुरुवात झाली ती त्वरित करावी अशी गोजमगुंडे यांची मागणी आहे.


Comments

Top