logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   लातूर न्यूज

रयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

शेतकरीरत्न, समाजरत्न, उद्योगरत्न, पत्रकाररत्न, शिक्षकरत्न असे पुरस्कार

रयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

लातूर: विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना दिल्या रयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन येथील रयत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. रयत प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था आहे. २०१५ संस्थेने रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अवयवदान प्रचार प्रसिद्धी, गरजुंना गरम व उबदार कपडे वाटप, शेतकरी मेळावे, गणेशोत्सव आणि शिवजयंतीनिमित्त व्याख्याने असे विविध उपक्रम घेते. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना रयत पुरस्काराने सन्मानित केले जाते. रयत विद्यार्थी रत्न, शेतकरीरत्न, समाजरत्न, उद्योगरत्न, पत्रकाररत्न, शिक्षकरत्न असे पुरस्कार असतात. साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१८ आहे.
प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता- समर्थ ऑप्टीकल, चंद्रनगर, शाहू कालेज रोड, लातूर फ़ोन ९९२३०९५७७७ आणि लातूर कपडा बँक, आपली आवडच्या पाठीमागे, शिवाजी चौक, लातूर फ़ोन ९४२२०२३९१७ याठिकाणी प्रस्ताव पाठवायचे आहेत. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आर.डी.काळे यांनी सांगितले आहे. ०२ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानचा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यावेळी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.


Comments

Top