logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   लातूर न्यूज

रेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख

भूल गया सब कुछ, याद नही अब कुछ असे भाजपाचे गाणे

रेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान  – धीरज देशमुख

रेणापूर : लोकनेते विलासराव देशमुख यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्नेहपूर्ण नात्यातून रेणापूर तालुका लातूर मतदारसंघात समाविष्ट झाला तेव्हा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरीक यांची प्रगती करत मिळवलेले स्थान हे अढळ आहे. रेणापुरच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला खंबीर साथ दिली. मनातून स्विकारले आहे. कोणी कितीही टिका केली, खोट बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी, रेणापूरकरांच्या मनातील काँग्रेसचे प्रेम कमी होऊ शकत नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी केले.
रेणा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊसाला अडीच हजार भाव दिल्याबद्दल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमख यांचा शेतकरी सभासदांनी सत्कार केला त्यात धिरज बोलत होते.
या प्रकाराला जनता कंटाळली असून भाजवाल्यांना " क्या हुवा तेरा वादा" असे जनता विचारत आहे, याचे कसलेही उत्तर न देता " भूल गया सब कुछ, याद नही अब कुछ" असे म्हणत भाजपवाले हात झटकत आहेत. त्यामुळे जनतेचा खूप मोठा भ्रम निरास जनतेच्या झाला आहे. येणा­ऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतपेटीतून आपला राग व्यक्त करून भाजपवाल्यांना घरचा रस्ता दाखवतील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
भाजपवाल्यांना जनतेच्या सुख दु:खाचे देणे घेणे नाही. स्वत: काहीच करायचे नाही मात्र काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात काय केले यावरच आज भाजपवाले बोलत आहेत. प्रचार काळात टिका, सत्तेत आल्यानंतर देखील टिकाच एवढेच भाजपाचे काम आहे अशी टीका धीरज यांनी केली.


Comments

Top