logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   लातूर न्यूज

लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत सोबत

लिंगायत समाजाच्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री

लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत सोबत

मुंबई-लातूर : महाराष्ट्रातील लिंगायत धर्मातील/ समाजातील मागण्यांच्या संदर्भात येथील सह्याद्री अतिथी गृह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीस राज्यमंञी तथा लिंगायत आरक्षण समितीचे शासकीय सदस्य विजय देशमुख व लिंगायत समाजाच्या संघटनांचे प्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली लावू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.
या बैठकीत अद्यापही अनआरक्षित जाती पोटजातींना आरक्षण, लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा शिफारस, महात्मा बसवेश्वर स्मारकास १०० कोटी निधी, इत्यादी बाबतीत चर्चा झाली.
लिंगायत धर्मातील अद्यापही अनआरक्षित उर्वरीत जाती पोटजातींना विशेषतः लिंगायत वाणी ओबीसी प्रवर्गातील उपजातींना लिंगायत वाणी तत्सम पोटजात असलेल्या वंचित अशा हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत, लिंगायत, लिंगधर, लिंगडेर, लिंगायत दिक्षिवंत, शिलवंत, चतूर्थ, पंचम, रड्डी, तिराळी, कानोडी इत्यादी यांना शुध्दीपञक काढून लिंगायत वाणी मधील ओबीसी चे आरक्षण अधिकार हक्क द्यावेत अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री यांनी त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला सकारात्मक टिप्पणी करायला लावू आणि हा प्रश्न सोडवू अशी ग्वाही दिली. तसेच याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांचे जाती पोटजातीचे प्रमाणपत्र गृहीत धरण्यासाठी सरकार मान्यता देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा राज्य सरकारची केंद्र सरकारकडे शिफारस बाबतीत मुख्यमंत्री म्हणाले की संविधानात्मक बाबतीत सरकार सकारात्मक असून त्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. राज्य मागासवर्ग आयोग व अल्पसंख्यांक विकास विभाग आयोग यांना लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक आदेश देण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. लिंगायत धर्म आणि लिंगायत धर्मातील जातींना आरक्षण एकाच वेळी दोन्ही घेता येणार नाही असे मुख्यमंत्री जेव्हा म्हणाले तेव्हा शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की राज्य मागासवर्ग आयोग लिंगायत हा धर्मपंथ म्हणून आरक्षण देता येत नाही असे सांगते आणि दुसरीकडे लिंगायत स्वतंत्र धर्म असताना नाही म्हणून अल्पसंख्यांक नाकारले जाते अशावेळी लिंगायत यांनी काय करायचे असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले की लिंगायत यांचे कोणतेही संविधानिक घटनात्मक अधिकार डावलले जाणार नाहीत, त्यांना त्यांचा अधिकार दिला जाईल, त्याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय सरकार घेईल असे सांगितले.


Comments

Top