logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   लातूर न्यूज

साथीचे आजार रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करा- आ. अमित देशमुख

मनपा आयुक्तांना पत्र, सहकार्य करण्याचेही अश्वासन

साथीचे आजार रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करा- आ. अमित देशमुख

लातूर: शहरात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूची साथ मोठया प्रमाणात पसरली आहे. महानगरपालिकेने याची तातडीने दखल घेवून साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर उपाय योजावेत अशा आशयाच्या सूचना आमदार अमित देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केल्या आहेत.
लातूरच्या मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की,
वातावरणात बदल झाल्यामुळे शहरात साथीचे आजार झपाटयाने वाढत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे. नाल्या, गटारी वेळेवर साफ होत नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. शहरातील सर्व रुग्णांलयात रुग्णांची गर्दी मोठया प्रमाणात वाढली आहे. या रुग्णांची तपासणी केली असता डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. ही बाब धोकादायक असून वेळीच काळजी घेतली नाही तर यातून अनर्थ उद्भावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महापालिकेने आरोग्य यंत्रणा उभारुन युध्द पातळीवर उपाय योजना कराव्यात असे देशमुख यांनी पत्रात म्हणले आहे.
शासनाच्या आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून महापालिकेने स्वच्छता औषध फवारणी आणि जनजागृतीची मोहिम तातडीने हाती घ्यावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे अश्वासनही आमदार देशमुख यांनी पाठवलेल्या पत्रात दिले आहे.


Comments

Top