HOME   लातूर न्यूज

वैशालीताई देशमुख यांना सर्वाधिक ऊस पुरवठयाचा बहुमान

ऊस तोडणी आणि ऊस वाहतूक ठेकेदारांचाही सत्कार


वैशालीताई देशमुख यांना सर्वाधिक ऊस पुरवठयाचा बहुमान

लातूर: २०१७–१८ च्या गळीत हंगामात साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करण्याचा बहुमान कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांना मिळाला आहे. निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास त्यांनी एक हजार टन ऊसाचा पुरवठा केला.
कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वैशालीताईंच्या वतीने अमित देशमुख यांनी सन्मान स्विकारला. आमदार त्र्यंबक भिसे यांनी अमित देशमुख यांचा सत्कार केला.
याच सभेत ऊस पुरवठा करणारे ऊस उत्पादक शेतकरी व सर्वाधिक पुरवठा करणारे ऊस तोडणी ठेकेदार व सर्वाधिक वाहतूक करणारे ठेकेदार यांचा सत्कार केला. यात बोरगाव काळेच्या मंगलबाई जाधव, पिंपरी आंबाचे जयचंद भिसे, पेठचे दासराव सूर्यवंशी, आखरवाईचे दीपक घुले, या ऊस उत्पादकांचा समावेश होता. राजेंद्र लोंढे, रामजी राठोड, रमाकांत राठोड, आण्णासाहेब काळे, तुकाराम बचाटे, तात्याराव भिसे व शशिकांत देशमुख या ऊस तोडणी आणि ऊस वाहतूक करणारे ठेकेदारांचा समावेश होता.


Comments

Top