HOME   लातूर न्यूज

मराठवाडा व्यापारी महासंघाचे मिसकॉल अभियान

परकीय थेट गुंतवणुकीस हजारो व्यापाऱ्यांनी केला विरोध


मराठवाडा व्यापारी महासंघाचे मिसकॉल अभियान

लातूर : परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात आले यात हजारो व्यापाऱ्यांनी विरोध नोंदवला .
चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅंड ट्रेडच्या आवाहनानुसार भारत व्यापार बंद करण्यात आला . या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाने मिसकॉल अभियान राबविले होते. व्यापार्‍यांना मिसकॉल देऊन निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला हजारो व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी दिली.
याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले .रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूकीला परवानगी देवू नये ,रिटेल व्यापारात परदेशी गुंतवणुकीला दिलेली शंभर टक्के परवानगी मागे घ्यावी ,ई कॉमर्स धोरण तात्काळआगे घ्यावे ,जी एस टी मध्ये दोनच प्रकारचे दर असावे ,व्यापाऱ्यांना केला जाणारा कसलाही कर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये ,उत्तरप्रदेश प्रमाणे व्यापाऱ्यांचा दहा लाख रुपयांचा दुर्घटना विमा काढावा ,पाच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त करावे व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा, धिरज तिवारी, संजय काथवटे, रईस टाके,बसवराज मंगरुळे, विशाल खंडेलवाल, विजय पारीख, दिनेश ब्रिजवासी,संजय हत्ते राजेश फडकुले, दगडू लांडगे ,रामेश्वर पुनपाळे नागेशअप्पा बावगे, यशवंत रांजणकर उपस्थित होते .


Comments

Top