HOME   लातूर न्यूज

बंदमध्ये जिल्ह्यातील दीड हजार औषधी विक्रेते सहभागी

विविध व्यापारी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला


बंदमध्ये जिल्ह्यातील दीड हजार औषधी विक्रेते सहभागी

लातूर: औषधांच्या ऑनलाईन विक्री व ई -फार्मसीजच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील दीड हजार औषधी विक्रेते सहभागी झाले होते. शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्च्यात लातूर व्यापारी महासंघ, दयानंद फार्मसी महाविद्यालय, चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय, बसवेश्वर फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बंदला रिटेल कंझुमर असोसिएशन, भांडी असोसिएशन, सराफ असोसिएशन, रेडिमेड असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, दुचाकी - चार चाकी वाहन व्यापारी असोसिएशन सह विविध व्यापारी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता.
सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या ऑनलाईन औषधी विक्रीवर तात्काळ निर्बंध घालण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हातील सर्व तहसीलदारांना देण्य़ात आले.
बंद आणि मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बोधकुमार चापसी, सचिव रामदास भोसले यांसह ओमप्रकाश बाहेती, ईश्वर बाहेती, रीशचंद्र बलशेटवार, अतुल कोटलवार, अंकुश भोसले, अनिल स्वामी, रमेश भांगडिया, प्रकाश रेड्डी, शिरीष कोटलवार, नागेश स्वामी, राजकुमार राजारूपे, अरविंद औरादे, रविंद्र दरक, मनोज आगाशे, संजय कर्वा आदिंनी परिश्रम घेतले.


Comments

Top