HOME   लातूर न्यूज

पूर्वांचल विद्यार्थ्यांचे लातूरात पथसंचलन

शहरातील प्रमुख मार्गावर पथसंचलन.


पूर्वांचल विद्यार्थ्यांचे लातूरात पथसंचलन

लातूर: मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज सकाळी पथसंचलन करुन लातूरकरांना मंत्रमुग्ध केले. या पथसंचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीचे स्वयंसेवक व स्वयंसेविकाही सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पूर्वांचल विकास विभागाच्यावतीने महाराष्ट्रात मेघालय, नागालॅण्ड व मणिपूर येथील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे पाच दिवसीय शिबीर येथील देशीकेंद्र विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त शिबिराच्या तिसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांचे हे सघोष पथसंचलन काढण्यात आले होते. आज सकाळी ६ वाजता लातूरमधील प्रतिथयश व्यावसायिक हरीश कटारिया, किशोर कटारिया, बीएस पवार, दिनेश पपरुनिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन या पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली. सिग्नल कॅम्प, पत्रकार रोड, सोनवणे कॉलेज, आर्यसमाज मंदीर, रामनगर, लातूर अर्बन बँक या मार्गावरुन फिरुन हे पथसंचलन देशीकेंद्र विद्यालयात विसर्जित झाले. अतिशय शिस्तबध्द आणि घोषाच्या तालावर काढण्यात आलेल्या या पथसंचलनावर लातूरकर स्त्री-पुरुष नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शरदभाऊ खाडिलकर, माधव घांगुर्डे, संजय काठे, हरिभाऊ चौधरी, शिबीर प्रमुख अतुल ठोंबरे, योगेश तोतला उपस्थित होती.


Comments

Top