HOME   लातूर न्यूज

विलास कारखान्याचा उच्चांक एका दिवसात ०४ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप

अल्पावधीत कारखान्याने तांत्रिक क्षमतेमतेकडे लक्ष देत घातला आदर्श


विलास कारखान्याचा उच्चांक एका दिवसात ०४ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप

लातूर: वैशाली नगर येथील निवळी साखर कारखान्याने तांत्रीक कार्यक्षमतेचा पूरेपूर वापर करून एका दिवसात ४ हजार ६०० मे. टन उंच्चाकी ऊसाचे गाळप करून विक्रम केला आहे. कारखान्याचे आज पर्यंतच्या प्रतीदिन ऊस गाळपातील हे उच्चांकी गाळप आहे. हंगामात सर्वांधिक ऊस गळीताचा विक्रम केल्या बददल सर्व सभासद, ऊस उत्पादक, संचालक, अधिकारी, कर्मचारी व कामगार तोडणी व वाहतूक ठेकेदार व मजुरांचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता पाहता सभासद व ऊसउत्पादकांच्या ऊसाचे गाळप वेळेवर करण्यासाठी कारखान्या कडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. हंगामाची सुरूवात झाल्या पासून प्रतिदिन ऊसाचे गाळप जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ऊसतोडणी, ऊसवाहतूक वेळेवर करून गाळप करण्यासाठी शेतकी, इंजिनीअरीग, उत्पादनसह सर्व विभागाचा समन्वय ठेवून संचालक मंडळ व प्रशासन दक्ष राहीले आहे.
या अगोदर कारखान्याचा सर्वांधिक ऊस गळीताचा एका दिवसात ४ हजार ४८० मे.टन ऊस् गळीताचा उंच्चाक होता. चालू हंगामात सर्वांच्या प्रयत्नातून १४ नोव्हेंबर रोजी कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ३ हजार ५०० मे. टन असातांना एका दिवसात ४ हजार ६०० मे.टन उंच्चाकी ऊस गाळप करण्याचा विक्रम केला आहे. एका दिवसात ४ हजार ६०० मे. टन उंच्चाकी ऊस गाळप करण्याचा विक्रम केल्या बद्दल सर्व ऊस उत्पादक, सभासद, व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, सर्व संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक एसव्ही बारबोले, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस् तोडणी–वाहतूक ठेकेदार सर्वांचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.


Comments

Top