logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   लातूर न्यूज

मनपातील १२०० सफाई कामगारांना साड्या-ब्लॅंकेटचे वाटप

अण्णाराव पाटील यांचा कृतज्ञता सोहळा

मनपातील १२०० सफाई कामगारांना साड्या-ब्लॅंकेटचे वाटप

लातूर: शहरात जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून सफाईचे काम करणाऱ्या मनपा कांचार्याप्रति कृतज्ञता व्यक्त व्हाव्ही म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने येथील १२०० सफाई कर्मचाऱ्यांना बुधवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कवर साड्या व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यामध्ये ६०० महिला व ६०० पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांच्यासह अ‍ॅड प्रियंदा गजेंद्र सोनटक्के व यज्ञश्री अण्णाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघाडीचे उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे हे होते. प्रमुख मान्यवर म्हणून पक्षाचे प्रवक्ता डॉ. सुरेश वाघमारे सरचिटणीस उमर्दराज खान प्रदेश अध्यक्ष मंचकराव डोने सुभाष लवटे दैनिक भूकंपचे संपादक अशोक चिंचोले नगरसेविका सपना किसवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अण्णाराव पाटील यांच्या भविष्यात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सेफ्टी मास्क वाटप करणार असल्याचे सांगितले. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार महाराष्ट्र विकास आघाडी लातूर शहर जिल्हाध्यक्ष इस्माईल फुलारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी युवा जिल्हाध्यक्ष नाजम शेख शहर जिल्हा कार्याध्यक्ष कल्याण पाटील, सत्तार शेख, इनाम सायद, बापू घोलप, शायक शेख आदींनी परिश्रम घेतले.


Comments

Top