logo

HOME   लातूर न्यूज

मराठा आरक्षणाच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा

आ. अमित देशमुख यांनी घेतली आझाद मैदानावरील उपोषणकर्त्यांची भेट

मराठा आरक्षणाच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा

लातूर-मुंबई: मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज त्यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सध्या सुरु असलेल्या आंदोलनास आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. आरक्षणाच्या या प्रश्नावर नानासाहेब जावळे पाटील यांनी कोणतीही आततायी भूमिका घेवू नये असे आवाहनही आमदार अमित देशमुख यांनी केले.


Comments

Top