logo

HOME   लातूर न्यूज

भाजपाच्या ग्रामीण मतरसंघातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

मुख्यमंत्र्यांसह सरकारचे कार्यकर्त्यांनी मानले आभार

भाजपाच्या ग्रामीण मतरसंघातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मांडून त्यास मंजुरी दिली व मराठा समाजास १६ टक्के एवढे आरक्षण जाहिर केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होताच लातूर ग्रामीण मतदार संघातील मराठा समाज बांधवांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. मराठा समाजास आरक्षण दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ग्रामीण मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लातूर शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूरचे तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ सरवदे, लातूर पसचे गटनेते भैरवनाथ पिसाळ, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, विक्रम शिंदे, बन्सी भिसे, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, प्रताप पाटील, चंद्राकांत कातळे, राजकिरण साठे, धनराज ‍शिंदे, विजय चव्हाण, विनायक मगर, गोपाळ पवार, पद्माकर होळकर, सुखदेव भरडे, धर्मराज शिंदे, सतिश कदम, सुधाकर फुले, सतिश बिराजदार, सुनिल भिसे, अजित पाटील, समाधान कदम, सुधाकर शिंदे, अमर शिंदे, धर्मराज शिंदे, संजय ठाकुर, सुखदेव बरडे, विकास शींदे, मारोती माने, श्रीकृष्ण पवार, किशन क्षीरसागर आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.


Comments

Top