logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यात नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजूरी

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

लातूर जिल्ह्यात नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजूरी

लातूर: मुख्यमंत्री कृषी ऊर्जा वाहिनी अंतर्गत शेतकर्‍यांना वीज उपलब्ध व्हावी याकरीता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आणखी नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूरी दिली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विद्युत कामांना तात्काळ गती देण्यात यावी असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
शेतकर्‍याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम व अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास या धोरणानुसार समाजातील प्रत्येक घटकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच शेतकर्‍यांना २४ तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येवून या माध्यमातून शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेलाही मुबलक वीज पुरवठा करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा वाहिनी अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आगामी काळात जिल्ह्यात आणखी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केलेला होता. त्यानुसारच जिल्ह्यातील मदनसुरी, केळगाव, तांबाळा, शेडोळ, चिंचोली तपसे, शिरसी हंगरगा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. तसेच किल्लारी, लिंबाळा दाऊ, साकोळ, एकोजी मुदगड, भेटा, भादा, उंबडगा, कामखेडा,पाथरटवाडी, मातोळा, विळेगाव, ढाळेगाव, थोडगा, लांजी याही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसह जिल्ह्यातील प्रलंबित विद्युत कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री निलंगेकर यांच्या पुढाकारातून मुंबई येथे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीत केळगाव, मदनसुरी, तांबाळा, शेडोळ, चिंचोली तपसे, शिरसी हंगरगा येथील सौर ऊर्जा प्रकल्पांना विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात आलेली असून इतर प्रस्तावित करण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत अशा सूचना ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर या बैठकीत निलंगा विद्युत उपविभागाचे विभाजन करण्याचा जो प्रस्ताव होता त्यावर चर्चा झाली. याबाबत निलंगा उपविभागाची पुर्नरचना करण्यात यावी अशा सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिलेले आहेत. यामुळे निलंगा विद्युत उपविभागाला मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील इतर प्रलंबित विद्युत कामांचा आढावा घेवून ही प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागावीत असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.


Comments

Top