HOME   लातूर न्यूज

नाट्यगृहासाठी वाढीव दहा कोटी रुपयांचा निधी

अर्थमंत्री मुनगंटीवार यांची मंजुरी- अभिमन्यू पवार यांची माहिती


नाट्यगृहासाठी वाढीव दहा कोटी रुपयांचा निधी

लातूर: लातूर येथील नियोजित नाट्यगृहासाठी दहा कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे नाटयगृहासाठी आता एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली .
काही दिवसांर्वी सुधीर मुनगंटीवार लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी नाट्यगृहासाठी निधी मंजूर करण्याची मागणी लातुरातील नाट्यप्रेमींनी त्यांच्याकडे केली होती. ही मागणी लक्षात घेत अर्थमंत्र्यानी हिवाळी अधिवेशनात १५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु हा निधी अपुरा पडणार होता. या संदर्भात महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी वित्त विभागाला कळवले होते. याची दाखल घेऊन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी वाढीव दहा कोटी रुपये नाट्यगृहासाठी देण्यास तत्वतः मान्यता दिली असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
शहरात उभ्या राहणाऱ्या या नाट्यगृहासाठी आता एकूण २५ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यामुळे या निधीतून नाट्यगृहाची भव्य वास्तू उभी राहणार आहे. माध्यमातून लातूरकरांना नाट्यप्रयोग करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे अभिमन्यू पवार म्हणाले. वाढीव दहा कोटी रुपये देण्यास मान्यता दिल्याने लातूरकर नाट्यप्रेमी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि अभिमन्यू पवार यांचे आभार व्यक्त करीत आहेत.


Comments

Top