logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   लातूर न्यूज

विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हुंकार सभेचे आयोजन

राम मंदिरासाठी परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले आंदोलन आता अंतिम टप्प्यात

विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हुंकार सभेचे आयोजन

लातूर: देशातील हिंदुवासियांचे श्रध्दास्थान असलेले श्रीप्रभू रामचंद्र यांचे अयोध्येत होणारे राममंदीर प्रत्येक हिंदुंसाठी अस्मितेचे आहे. अयोध्या येथील रामजन्म भूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने चालू आहेत. विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेले हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेले असून न्यायप्रविष्ट असलेले हे प्रकरण न्यायसंस्थेस प्राथमिकतेचे वाटत नाही. त्यामुळेच विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी लातूर येथे सायंकाळी पाच वाजता बंकटलाल विद्यालयाच्या मैदानावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्या येथील रामजन्मभूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे ही प्रत्येक हिंदुवासियांची इच्छा आहे. या इच्छेपुर्तीसाठी विश्‍व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष उभा करून यामध्ये अनेकांनी आपले बलिदान सुध्दा दिले आहे. राम मंदीराचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आलेला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदीरचा विषय आमच्याकरीता प्राथमिकतेचा नाही असे सांगून सदर प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात ठेवलेली आहे. यामुळे तमाम हिंदुवासियांची घोर निराशा झालेली असून राम मंदीर उभारण्याकरीता हिंदु समाजाने आता एकत्रित येण्याची वेळ आलेली आहे. याबाबत सत्य परिस्थिती विषद करून राम मंदीर उभा करण्याकरीता विश्‍व हिंदु परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लातूर येथे विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवार ०९ डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता बंकटलाल विद्यालयाच्या मैदानावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या हुंकार सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर हे संबोधित करणार आहेत. या हुंकार सभेसह राम मंदीर उभारणीच्या लढ्याला अधिकाधिक पाठिंबा मिळावा याकरीता विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने जिल्हाभरात बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीला हिंदू समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून रविवारी होणारी हुंकार सभा विक्रमी करण्याचा मनोदय बैठकीतून व्यक्त होत आहे. या हुंकार सभेला जिल्ह्यातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजित देशपांडे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार कोनाळे, जिल्हा मंत्री विलास खिंडे, महानगरमंत्री प्रणव रायचूरकर, बालाप्रसाद बाहेती, किशोर कुलकर्णी, मंगेश तिडके, खंडागळे आदींसह विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केलेले आहे.


Comments

Top